मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : पोलार्डने पुन्हा पंजाबला धुतलं, मुंबईची 176 रनपर्यंत मजल

IPL 2020 : पोलार्डने पुन्हा पंजाबला धुतलं, मुंबईची 176 रनपर्यंत मजल

कायरन पोलार्ड (Kieron Pollard) ने पुन्हा एकदा पंजाब (KXIP) ला तडाखा दिला आहे. पोलार्डने 12 बॉलमध्ये केलेल्या नाबाद 34 रनमुळे मुंबईने 20 ओव्हरमध्ये 176 रनपर्यंत मजल मारली आहे.

कायरन पोलार्ड (Kieron Pollard) ने पुन्हा एकदा पंजाब (KXIP) ला तडाखा दिला आहे. पोलार्डने 12 बॉलमध्ये केलेल्या नाबाद 34 रनमुळे मुंबईने 20 ओव्हरमध्ये 176 रनपर्यंत मजल मारली आहे.

कायरन पोलार्ड (Kieron Pollard) ने पुन्हा एकदा पंजाब (KXIP) ला तडाखा दिला आहे. पोलार्डने 12 बॉलमध्ये केलेल्या नाबाद 34 रनमुळे मुंबईने 20 ओव्हरमध्ये 176 रनपर्यंत मजल मारली आहे.

  • Published by:  Shreyas

दुबई, 18 ऑक्टोबर : कायरन पोलार्ड (Kieron Pollard) ने पुन्हा एकदा पंजाब (KXIP) ला तडाखा दिला आहे. पोलार्डने 12 बॉलमध्ये केलेल्या नाबाद 34 रनमुळे मुंबईने 20 ओव्हरमध्ये 176 रनपर्यंत मजल मारली आहे. शेवटच्या 3 ओव्हरमध्ये मुंबईने 54 रन केले. पोलार्डला कुल्टर नाईल यानेही चांगली साथ दिली. कुल्टर नाईल 12 बॉलमध्ये 54 रनवर नाबाद राहिला. पोलार्ड आणि कुल्टर नाईल यांच्यात 21 बॉलमध्ये 57 रनची पार्टनरशीप झाली. या मॅचमध्ये मुंबईने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. ओपनर रोहित शर्मा फक्त 9 रन करून माघारी परतला, तर फॉर्ममध्ये असलेला सूर्यकुमार यादव शून्य रनवर आऊट झाला. एकीकडे मुंबईच्या विकेट पडत असताना क्विंटन डिकॉक मात्र दुसऱ्या बाजूला उभा होता. डिकॉकने 43 बॉलमध्ये 53 रन केले. तर कृणाल पांड्यानेही त्याला चांगली साथ दिली. कृणाल 30 बॉलमध्ये 34 रन करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. मुंबईने 16.3 ओव्हरमध्ये 119 रनवर 6 विकेट गमावल्या होत्या, पण पोलार्ड आणि कुल्टर नाईलने त्यांना या स्कोअरपर्यंत पोहोचवलं.

पंजाबकडून मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर क्रिस जॉर्डन आणि रवी बिष्णोई यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

या मॅचमध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचमध्ये मुंबई (Mumbai Indians) ने आणि पंजाबनी त्यांच्या टीममध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. पंजाबसाठी या मॅचमध्ये विजय मिळवणं जास्त गरजेचं आहे. पॉईंट्स टेबलमध्ये पंजाबची टीम शेवटच्या क्रमांकावर आहे. त्यांनी 8 पैकी 2 मॅचमध्ये विजय मिळवला, तर 6 मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. प्ले-ऑफच्या रेसमध्ये कायम राहण्यासाठी पंजाबला हा सामना जिंकणं गरजेचं आहे. दुसरीकडे मुंबईची टीम पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी 8 पैकी 6 सामने जिंकले असून 2 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. आजच्या मॅचमध्ये मुंबई जिंकली, तर ते पॉईंट्स टेबलमध्ये पुन्हा पहिल्या क्रमांकावर जातील. मुंबईची टीम रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, नॅथन कुल्टर नाईल, राहुल चहर, ट्रेन्ट बोल्ट, जसप्रीत बुमराह पंजाबची टीम केएल राहुल, मयंक अग्रवाल, क्रिस गेल, ग्लेन मॅक्सवेल, निकोलस पूरन, दीपक हुडा, क्रिस जॉर्डन, मुरुगन अश्विन, मोहम्मद शमी, रवी बिष्णोई, अर्शदीप सिंग
First published:

पुढील बातम्या