स्पोर्ट्स

  • associate partner

IPL 2020 : पंजाबचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, अशी आहे मुंबईची टीम

IPL 2020 : पंजाबचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, अशी आहे मुंबईची टीम

आयपीएल (IPL 2020)च्या 13व्या मॅचमध्ये पंजाब (Kings XI Punjab)ने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

अबु धाबी, 1 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या 13व्या मॅचमध्ये पंजाब (Kings XI Punjab)ने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. मागच्या मॅचमध्ये सुपर ओव्हरमध्ये पराभव झाल्यानंतर मुंबई (Mumbai Indians)पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर येण्यासाठी प्रयत्नशील असेल. मुंबईने पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर पंजाबने मुरुगन अश्विनच्याऐवजी गौतमला संधी दिली आहे.

यंदाच्या आयपीएल मोसमात मुंबईचा चेन्नई (Chennai Superkings)विरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये पराभव झाला, तर कोलकात्या (Kolkata Knight Riders)विरुद्धची मॅच मुंबई अगदी आरामात जिंकली. यानंतर विराट कोहली (Virat Kohli)च्या बैंगलोर (Royal Challengers Bangalore)विरुद्ध झालेली अत्यंत रोमांचक मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली आणि मुंबईला पराभव पत्करावा लागला.

पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम सध्या सहाव्या क्रमांकावर आहे, तर पंजाब पाचव्या क्रमांकावर आहे. मुंबई प्रमाणेच पंजाबनेही 3 पैकी 1 मॅचमध्ये विजय मिळवला, तर 2 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला.

मुंबईची टीम

रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, जेम्स पॅटिनसन, राहुल चहर, ट्रेन्ट बोल्ट, जसप्रीत बुमराह

पंजाबची टीम

केएल राहुल, मयंक अग्रवाल, निकोलास पूरन, ग्लेन मॅक्सवेल, करुण नायर, जेम्स नीशम, सरफराज खान, कृष्णप्पा गौतम, मोहम्मद शमी, शेल्डन कॉट्रेल, रवी बिष्णोई

Published by: Shreyas
First published: October 1, 2020, 7:24 PM IST

ताज्या बातम्या