IPL 2020 : 5 सिक्स पडलेल्या कॉट्रेलचं धमाकेदार पुनरागमन, डिकॉकचा मिडल स्टम्प उडवला

IPL 2020 : 5 सिक्स पडलेल्या कॉट्रेलचं धमाकेदार पुनरागमन, डिकॉकचा मिडल स्टम्प उडवला

क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. एक दिवस खेळाडू मॅच हरवतो, तर दुसऱ्याच दिवशी तोच खेळाडू धमाकेदार पुनरागमन करतो. आयपीएल (IPL 2020)मध्ये शेल्डन कॉट्रेल (Sheldon Cottrell)नेही असंच केलं आहे.

  • Share this:

अबु धाबी, 1 ऑक्टोबर : क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. एक दिवस खेळाडू मॅच हरवतो, तर दुसऱ्याच दिवशी तोच खेळाडू धमाकेदार पुनरागमन करतो. आयपीएल (IPL 2020)मध्ये शेल्डन कॉट्रेल (Sheldon Cottrell)नेही असंच केलं आहे. वेस्ट इंडिजच्या या डावखुऱ्या फास्ट बॉलरने राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)विरुद्ध बऱ्याच रन दिल्या होत्या. राजस्थानने कॉट्रेलच्या एकाच ओव्हरला 5 सिक्स लगावल्या होत्या. यामुळे पंजाब (Kings XI Punjab) च्या टीमने जिंकलेली मॅच हरली होती.

मागच्या मॅचमधल्या खराब कामगिरीनंतरही पंजाबच्या टीमने कॉट्रेलला पुन्हा संधी दिली. या संधीचं कॉट्रेलने सोनं केलं. मुंबई (Mumbai Indians) विरुद्धच्या मॅचमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये कॉट्रेलने विकेट घेतली. मॅचच्या पाचव्या बॉलवरच कॉट्रेलने क्विंटन डिकॉकला बोल्ड केलं. कॉट्रेलचा आऊट स्विंग डिकॉकला समजलाच नाही, त्यामुळे त्याचा मिडल स्टम्पचं उडाला. कॉमेंट्री करत असताना इरफान पठाणने कोणत्याही डावखुऱ्या फास्ट बॉलरसाठी हा ड्रीम बॉल असल्याचं म्हणलं.

शेल्डन कॉट्रेलने यंदाच्या आयपीएल दरम्यान शानदार बॉलिंग केली आहे. पावरप्लेमध्ये कॉट्रेलने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या आहेत. कॉट्रेलचा जोडीदार शमीनेही या मोसमात पावरप्लेमध्ये 3 विकेट मिळवल्या. शेल्डन कॉट्रेलने एक मॅच सोडून या मोसमात चांगली बॉलिंग केली. यंदा कॉट्रेलने 6 विकेट घेतल्या आहेत. त्याचा इकोनॉमी रेट मात्र 8.46 एवढा आहे. मुंबई विरुद्धच्या मॅचमध्ये मात्र त्याने 4 ओव्हरमध्ये 20 रन देऊन 1 विकेट घेतली.

Published by: Shreyas
First published: October 1, 2020, 11:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या