IPL 2020 : पंजाबची बॅटिंग डगमगली, हैदराबादला 127 रनचं आव्हान

IPL 2020 : पंजाबची बॅटिंग डगमगली, हैदराबादला 127 रनचं आव्हान

आयपीएल (IPL 2020)च्या आजच्या दुसऱ्या मॅचमध्ये पंजाब (KXIP)ची बॅटिंग डगमगली आहे. पंजाबच्या टीमला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून फक्त 126 रनच करता आल्या.

  • Share this:

दुबई, 24 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या आजच्या दुसऱ्या मॅचमध्ये पंजाब (KXIP)ची बॅटिंग डगमगली आहे. पंजाबच्या टीमला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून फक्त 126 रनच करता आल्या. केएल राहुल आणि मनदीप सिंग यांनी पंजाबला सावध सुरुवात करुन दिल्यानंतरही दोघांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पंजाबकडून निकोलस पूरनने सर्वाधिक नाबाद 32 रनची खेळी केली. केएल राहुल (27 रन) आणि क्रिस गेल (20 रन) यांना चांगली सुरुवात मिळाल्यानंतरही मोठा स्कोअर करता आला नाही. हैदराबाद (SRH)कडून संदीप शर्मा, जेसन होल्डर आणि राशिद खानला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या.

या मॅचमध्ये हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. आजच्या पहिल्या सामन्यात कोलकाता (KKR)ने दिल्ली (Delhi Capitals)चा पराभव केला, त्यामुळे हैदराबाद आणि पंजाब यांचं प्ले-ऑफला पोहोचण्याचं आव्हान थोडं कठीण झालं आहे.

हैदराबादने या मॅचमध्ये एक बदल केला आहे. खलील अहमद हा शाहबाज नदीमच्याऐवजी टीममध्ये आला आहे. तर पंजाबने मयंक अग्रवाल आणि जेम्स निशमच्या जागी मनदीप सिंग आणि क्रिस जॉर्डनला टीममध्ये घेतलं आहे.

पॉईंट्स टेबलमध्ये हैदराबादची टीम पाचव्या क्रमांकावर आणि पंजाब सहाव्या क्रमांकावर आहे. या दोन्ही टीमनी 10 पैकी 4 मॅच जिंकल्या असून 6 मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. पण हैदराबादचा नेट रनरेट चांगला असल्यामुळे ते पंजाबच्या पुढे आहेत.

पंजाबची टीम

केएल राहुल, क्रिस गेल, निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल, मनदीप सिंग, दीपक हुडा, मुरुगन अश्विन, क्रिस जॉर्डन, मोहम्मद शमी, रवी बिष्णोई, अर्शदीप सिंग

हैदराबादची टीम

डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेयरस्टो, मनिष पांडे, विजय शंकर, प्रियम गर्ग, अब्दुल समद, जेसन होल्डर, राशिद खान, खलील अहमद, संदीप शर्मा, टी. नटराजन

Published by: Shreyas
First published: October 24, 2020, 7:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या