मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : पंजाबने सोडून दिलं, पण आता हे 2 खेळाडू गाजवत आहेत आयपीएल

IPL 2020 : पंजाबने सोडून दिलं, पण आता हे 2 खेळाडू गाजवत आहेत आयपीएल

आयपीएल (IPL 2020) मध्ये बरेच वेळा एका टीमकडून फारशी चांगली कामगिरी करु न शकणारे खेळाडू दुसऱ्या टीमसाठी मॅच विनर ठरतात. पंजाबच्या टीमची अवस्थाही काहीशी अशीच झाल्याचं म्हणावं लागेल. मागच्या दोन वर्षांमध्ये पंजाब (KXIP)च्या टीमने सोडलेले दोन खेळाडू आज दुसऱ्या टीमकडून खेळताना उत्कृष्ट कामगिरी करत आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
मुंबई, 25 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) मध्ये बरेच वेळा एका टीमकडून फारशी चांगली कामगिरी करु न शकणारे खेळाडू दुसऱ्या टीमसाठी मॅच विनर ठरतात. पंजाबच्या टीमची अवस्थाही काहीशी अशीच झाल्याचं म्हणावं लागेल. मागच्या दोन वर्षांमध्ये पंजाब (KXIP)च्या टीमने सोडलेले दोन खेळाडू आज दुसऱ्या टीमकडून खेळताना उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. वरुण चक्रवर्ती आणि सॅम करन यांना सोडल्याचं आता पंजाबला दु:ख होत असेल. 2019 च्या लिलावालत वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy)ला पंजाबने 7.4 कोटी रुपयांना विकत घेतलं, पण 2019 च्या कोलकात्याविरुद्धच्या पहिल्याच मॅचमध्ये वरुण चक्रवर्तीने 3 ओव्हरमध्ये 35 रन देऊन 1 विकेट घेतली. सुनिल नारायणने वरुण चक्रवर्तीच्या एका ओव्हरला 25 रन काढले, ज्यामध्ये 3 सिक्सचा समावेश होता. यानंतर वरुण चक्रवर्तीने पुढच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 10 रनच दिले, पण त्या मोसमातली चक्रवर्तीची ती मॅच शेवटची ठरली. दुखापतीमुळे वरुण चक्रवर्ती बाहेर झाला आणि मग 2020 सालच्या लिलावाआधी पंजाबने त्याला सोडून दिलं. पंजाबने वरुणला सोडून दिल्यानंतर डिसेंबर 2019 साली झालेल्या लिलावात कोलकाता (KKR)ने वरुण चक्रवर्तीला 4 कोटी रुपयांना विकत घेतलं. मिस्ट्री स्पिनर म्हणून ओळख असणाऱ्या वरुण चक्रवर्तीने दिल्लीविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये कोलकात्याला जिंकवून दिलं. वरुणने 4 ओव्हरमध्ये फक्त 20 रन देऊन दिल्लीच्या 5 विकेट घेतल्या. यंदाच्या मोसमात वरुण चक्रवर्ती हा कोलकात्याचा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे. वरुणने 10 मॅचमध्ये 23.50 ची सरासरी आणि 7.05 च्या इकोनॉमी रेटने 12 विकेट घेतल्या आहेत. वरुण चक्रवर्तीप्रमाणेच पंजाबच्या टीमने 2019 च्या मोसमानंतर सॅम करन (Sam Curran)ला सोडून दिलं होतं. लिलावामध्ये पंजाबने सॅम करनवर 7.2 कोटी रुपयांची बोली लावली होती. त्यावर्षातली परदेशी खेळाडूला मिळालेली ती सर्वाधिक रक्कम होती. मागच्या वर्षी सॅम करनने आयपीएलमध्ये हॅट्रिकही घेतली होती. 2019 साली सॅम करनने 9 मॅचमध्ये 32.30 ची सरासरी आणि 9.78 च्या इकोनॉमी रेटने 10 विकेट घेतल्या होत्या. तर बॅटिंग करताना त्याने 23.75 ची सरासरी आणि 172 च्या स्ट्राईक रेटने 95 रन केले होते. मागच्या वर्षी त्याने एक अर्धशतकही केलं होतं, तसंच त्याचा सर्वाधिक स्कोअर 55 रन होता. सॅम करनला डिसेंबर 2019 साली झालेल्या लिलावामध्ये चेन्नई सुपरकिंग्ज (CSK)ने 5.5 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. चेन्नईकडून खेळताना या मोसमात करनने 11 मॅचमध्ये 28.90 ची सरासरी आणि 8.50 च्या इकोनॉमी रेटने 10 विकेट घेतल्या आहेत. तर बॅटिंगमध्ये त्याने 11 मॅचमध्ये 21.62 ची सरासरी आणि 136.22 च्या स्ट्राईक रेटने 173 रन केले आहेत. यामध्ये एका अर्धशतकाचाही समावेश आहे. शुक्रवारी मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईची अवस्था अत्यंत वाईट झाली असताना करनने 52 रनची खेळी करुन चेन्नईची लाज राखली.
First published:

पुढील बातम्या