IPL 2020 : राहुलचा धडाका सुरूच, पंजाबचं चेन्नईला 179 रनचं आव्हान

IPL 2020 : राहुलचा धडाका सुरूच, पंजाबचं चेन्नईला 179 रनचं आव्हान

यंदाच्या आयपीएल (IPL 2020)मध्ये केएल राहुलच्या बॅटमधून रनचा धडाका सुरूच आहे. चेन्नई (Chennai Super Kings)विरुद्धच्या मॅचमध्ये राहुलने 52 बॉलमध्ये 63 रनची खेळी केली.

  • Share this:

अबु धाबी, 4 ऑक्टोबर : यंदाच्या आयपीएल (IPL 2020)मध्ये केएल राहुलच्या बॅटमधून रनचा धडाका सुरूच आहे. चेन्नई (Chennai Super Kings)विरुद्धच्या मॅचमध्ये राहुलने 52 बॉलमध्ये 63 रनची खेळी केली. यामुळे पंजाबने चेन्नईला विजयासाठी 179 रनचं आव्हान ठेवलं. टॉस जिंकून बॅटिंग करणाऱ्या पंजाबला 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 178 रन करता आल्या. पंजाबच्या सगळ्याच खेळाडूंना चांगली सुरुवात मिळाली.

राहुलसोबत ओपनिंगला आलेला मयंक अग्रवाल 19 बॉलमध्ये 26 रनवर आऊट झाला, तर मनदीप सिंगला 16 बॉलमध्ये 27 रन करता आले. निकोलस पूरनने 17 बॉलमध्ये 33 रनची फटकेबाजी केली. सरफराज खान 14 रनवर आणि मॅक्सवेल 11 रनवर नाबाद राहिले. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरला 2 आणि जडेजा-पियुष चावलाला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. अर्धशतकाच्या या खेळीसोबतच राहुल यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक रन करणारा खेळाडू बनला आहे. सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंना मिळणारी ऑरेंज कॅप सध्या राहुलकडे आहे.

पॉईंट्स टेबलमध्ये पंजाब आणि चेन्नईच्या टीम तळाला आहेत. या दोन्ही टीमनी त्यांच्या 4 पैकी 3 मॅच गमावल्या आहेत, तर एका मॅचमध्ये दोघांचा विजय झाला आहे. पंजाबच्या टीमचा नेट रनरेट चांगला असल्यामुळे ते 7व्या क्रमांकावर आहेत, तर धोनीची टीम 8व्या क्रमांकावर आहे. ही मॅच जिंकून विजयाच्या मार्गावर यायचं आव्हान दोन्ही टीमपुढे असणार आहे.

Published by: Shreyas
First published: October 4, 2020, 9:25 PM IST
Tags:

ताज्या बातम्या