• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2020 : 127 रन करण्यातही हैदराबाद अपयशी, पंजाबचा रोमांचक विजय

IPL 2020 : 127 रन करण्यातही हैदराबाद अपयशी, पंजाबचा रोमांचक विजय

आयपीएल (IPL 2020)च्या आजच्या दुसऱ्या मॅचमध्ये हैदराबाद (SRH)ला पंजाब (KXIP)ने दिलेलं 127 रनचं आव्हानही गाठण्यात अपयश आलं आहे.

 • Share this:
  दुबई, 24 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या आजच्या दुसऱ्या मॅचमध्ये हैदराबाद (SRH)ला पंजाब (KXIP)ने दिलेलं 127 रनचं आव्हानही गाठण्यात अपयश आलं आहे. हैदराबादचा 19.5 ओव्हरमध्ये 114 रनवर ऑल आऊट झाला, त्यामुळे पंजाबने ही मॅच 12 रननी जिंकली. पंजाबकडून क्रिस जॉर्डन आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमी, मुरुगन अश्विन आणि रवी बिष्णोई यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. हैदराबादकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 35 रन केले. या मॅचमध्ये हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हैदराबादच्या बॉलरनी पंजाबला 126 रनवर रोखलं. संदीप शर्मा, जेसन होल्डर आणि राशिद खान यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. पंजाबकडून निकोलस पूरनने सर्वाधिक नाबाद 32 रन केले. हैदराबादविरुद्धच्या या विजयाबरोबरच पंजाबची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आली आहे. पंजाबने 11 पैकी 5 मॅचमध्ये विजय मिळवला असून त्यांनी 6 मॅच गमावल्या आहेत. या विजयाबरोबरच त्यांनी प्ले-ऑफला पोहोचण्याचं त्यांचं आव्हान अजून कायम ठेवलं आहे. दुसरीकडे हैदराबादचं प्ले-ऑफला पोहोचणं आता कठीण झालं आहे. हैदराबादने 11 पैकी 4 मॅच जिंकल्या असून 7 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये हैदराबाद सहाव्या क्रमांकावर आहे. प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी आता हैदराबादला इतर टीमच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे.
  Published by:Shreyas
  First published: