मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : पंजाब विजयाच्या ट्रॅकवर, रोमांचक सामन्यात बँगलोरचा पराभव

IPL 2020 : पंजाब विजयाच्या ट्रॅकवर, रोमांचक सामन्यात बँगलोरचा पराभव

IPL 2020 क्रिस गेल (Chris Gayle) च्या आगमनानंतर पंजाब (KXIP) ची टीम विजयाच्या ट्रॅकवर आली आहे. बँगलोर (RCB) विरुद्धच्या रोमांचक सामन्यात पंजाबचा शेवटच्या बॉलवर विजय झाला आहे.

    शारजाह : क्रिस गेल (Chris Gayle) च्या आगमनानंतर पंजाब (KXIP) ची टीम विजयाच्या ट्रॅकवर आली आहे. बँगलोर (RCB) विरुद्धच्या रोमांचक सामन्यात पंजाबचा शेवटच्या बॉलवर विजय झाला आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये पंजाबला विजयासाठी 2 रनची गरज होती, पण तरीही त्यांना शेवटच्या बॉलवर 1 रन हवी होती, अखेर निकोलास पूरनने सिक्स मारून पंजाबला विजय मिळवून दिला. बँगलोरने ठेवलेल्या 172 रनचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात चांगली झाली. मयंक अग्रवाल आणि केएल राहुल यांच्यात 78 रनची ओपनिंग पार्टनरशीप झाली. मयंक अग्रवाल 25 बॉलमध्ये 45 रन करुन माघारी गेला. यंदाच्या मोसमातली आपली पहिलीच मॅच खेळणारा क्रिस गेलनेही अर्धशतकी खेळी केली. 45 बॉलमध्ये 53 रन करुन तो रनआऊट झाला. तर केएल राहुल 49 बॉलमध्ये 61 रनवर नाबाद राहिला. बँगलोरकडून युझवेंद्र चहलला एक विकेट मिळाली. या मॅचमध्ये विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण त्यांची सुरुवात खराब झाली. पंजाबच्या बॉलिंगसमोर बँगलोरच्या तगड्या बॅटिंगला संघर्ष करावा लागला. शेवटच्या ओव्हरमध्ये 24 रन आल्यामुळे बँगलोरला या धावसंख्येपर्यंत पोहोचता आलं. या मॅचमध्ये एबी डिव्हिलियर्सला सहाव्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवण्यात आलं. एबीच्याआधी वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबेला पाठवण्यात आल्यामुळे बँगलोरच्या रणनीतीवरही टीका झाली. बँगलोरकडून विराट कोहलीने सर्वाधिक 48 रन केले, तर क्रिस मॉरिस आणि इसरू उडाना यांनी शेवटच्या काही बॉलमध्ये फटकेबाजी केली. मॉरिसने 8 बॉलमध्ये नाबाद 25 रन आणि उडानाने 5 बॉलमध्ये नाबाद 10 रन केले. पंजाबकडून शमी आणि मुरुगन अश्विनने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या, तर अर्शदीप सिंग आणि क्रिस जॉर्डनला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. यंदाच्या मोसमातला पंजाबचा हा दुसरा विजय आहे. पंजाबने 8 पैकी 6 सामने गमावले आहेत. पॉईंट्स टेबलमध्येही पंजाबची टीम शेवटच्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे बँगलोरने या मोसमात खेळलेल्या 8 पैकी 5 मॅचमध्ये विजय मिळवला आणि 3 मॅच गमावल्या आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये बँगलोर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या