Home /News /sport /

IPL 2020 : पूरनचं धडाकेबाज अर्धशतक, पंजाबचा दिल्लीवर विजय

IPL 2020 : पूरनचं धडाकेबाज अर्धशतक, पंजाबचा दिल्लीवर विजय

IPL 2020 निकोलस पूरनने केलेल्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर पंजाब (KXIP)ने दिल्ली (Delhi Capitals)चा 5 विकेटने पराभव केला आहे.

    दुबई, 20 ऑक्टोबर : निकोलस पूरनने केलेल्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर पंजाब (KXIP)ने दिल्ली (Delhi Capitals)चा 5 विकेटने पराभव केला आहे. दिल्लीने ठेवलेल्या 168 रनच्या आव्हानाचा पाठलाग पंजाबने 19 ओव्हरमध्ये पूर्ण केला. दिल्लीचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या पंजाबची सुरुवात चांगली झाली नाही. फॉर्ममध्ये असलेले केएल राहुल आणि मयंक अग्रवाल लवकर माघारी परतले. राहुल 15 तर मयंक 5 रनवर आऊट झाले. यानंतर क्रिस गेलने 13 बॉलमध्ये 28 तर निकोलस पूरनने 28 बॉलमध्ये 53 रन केले. यंदाच्या मोसमात फॉर्मसाठी संघर्ष करणाऱ्या मॅक्सवेलनेही 24 बॉलमध्ये 32 रन करुन मोलाची मदत केली. दीपक हुडा 15 रनवर नाबाद आणि जेम्स नीशम 8 रनवर नाबाद राहिले. दिल्लीकडून कगिसो रबाडाला 2 विकेट मिळाल्या, तर अक्सर पटेल आणि रवीचंद्रन अश्विनला 1-1 विकेट घेण्यात यश आलं. या मॅचमध्ये दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर शिखर धवनच्या शतकामुळे दिल्लीला 167 रनपर्यंत मजल मारता आली. शिखर धवनचं हे लागोपाठ दुसरं शतक होतं. याआधी त्याने चेन्नईविरुद्धही शतकी खेळी केली होती. लागोपाठ दोन आयपीएल मॅचमध्ये शतक करणारा धवन हा पहिला खेळाडू ठरला आहे. शिखर धवन वगळता दिल्लीच्या कोणत्याही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पंजाबकडून मोहम्मद शमीला सर्वाधिक 2 विकेट मिळाल्या, तर ग्लेन मॅक्सवेल, जेम्स नीशम आणि मुरुगन अश्विन यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. दिल्लीविरुद्धच्या विजयानंतर पंजाबने पॉईंट्स टेबलमध्येही सातव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर उडी घेतली आहे. पंजाबने 10 पैकी 4 मॅच जिंकल्या आहेत, तर 6 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. तर दिल्ली मात्र पहिल्या क्रमांकावर कायम आहे. दिल्लीने 10 पैकी 7 सामने जिंकले असून 3 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या