स्पोर्ट्स

  • associate partner

IPL 2020 : पोलार्ड बॅटमध्ये लावतो ही वस्तू, आत्तापर्यंत ठोकलेत 682 सिक्स

IPL 2020 : पोलार्ड बॅटमध्ये लावतो ही वस्तू, आत्तापर्यंत ठोकलेत 682 सिक्स

आयपीएल (IPL 2020) मध्ये पंजाब (Kings XI Punjab)विरुद्धच्या मॅचमध्ये मुंबई (Mumbai Indians)ने दणदणीत विजय मिळवला.

  • Share this:

अबु धाबी, 02 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) मध्ये पंजाब (Kings XI Punjab)विरुद्धच्या मॅचमध्ये मुंबई (Mumbai Indians)ने दणदणीत विजय मिळवला. रोहित शर्मा (Rohit Sharma)चे अर्धशतक आणि मग कायरन पोलार्ड (Kieron Pollard)हार्दिक पांड्या (Hardik Pandya)ने तुफान फटकेबाजी करत मुंबईला 191 रनपर्यंत पोहोचवलं.

कायरन पोलार्ड हा नेहमीच मुंबईच्या टीमसाठी संकटमोचक ठरला आहे. अडचणीत सापडलेल्या मुंबईला त्याने असंख्य वेळा बाहेर काढलं आहे. गुरुवारी पंजाबविरुद्धच्या मॅचमध्येही मुंबईची टीम अवस्था बिकट होती, पण पोलार्डने 20 बॉलमध्ये 47 रनची खेळी केली. तो जेव्हा मैदानात आला तेव्हा मुंबईचा स्कोअर 13.1 ओव्हरमध्ये 85 रन होता, यानंतर मात्र त्याने मॅचचं रुपच बदलून टाकलं.

अबु धाबीमध्ये पोलार्ड पॉवर

कायरन पोलार्डने पंजाबविरुद्ध 15व्या ओव्हरमध्ये पहिली सिक्स लगावली. त्याने रवी बिष्णोईच्या ओव्हरपिच बॉलवर लॉन्ग ऑनच्या वरून सिक्स मारली. यानंतर पोलार्डने 19व्या ओव्हरच्या शेवटच्या 3 बॉलवर लागोपाठ 3 फोर मारले. तर शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने शेवटच्या 3 बॉलवर लागोपाठ 3 सिक्स लगावले. यामुळे मुंबईचा स्कोअर 191 रनपर्यंत पोहोचला. पोलार्डने हार्दिक पांड्यासोबत 23 बॉलमध्ये 67 रनची पार्टनरशीप केली.

पोलार्डची जबरदस्त कामगिरी

पोलार्डने या मोसमात जबरदस्त कामगिरी केली आहे. 4 इनिंगमध्ये 138 च्या सरासरीने त्याने 138 रन केले आहेत. यंदाच्या मोसमात पोलार्ड एकदाही आऊट झालेला नाही. एवढच नाही तर त्याचा स्ट्राईक रेटही 212 पेक्षा जास्त आहे, तसंच सर्वोत्तम स्कोअर नाबाद 60 रन आहे.

पोलार्डच्या पॉवर हिटिंगचं गुपित

पोलार्डच्या ताकदीसोबतच त्याची बॅटही पॉवर हिटिंग करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. शॉटमध्ये जास्त ताकद येण्यासाठी पोलार्ड मोठ्या बॅटचा वापर करतो, याचसोबत तो बॅटच्या हॅण्डलला 7 ग्रिप लावतो. आयपीएलमध्ये कॉमेंट्री करताना किरण मोरे यांनी हे गुपित उलगडून सांगितलं. सर्वसामान्यपणे बॅट्समन बॅटला 2 ग्रिपच वापरतात. पण एवढी ग्रिप वापरल्यामुळे पोलार्डला बॅट व्यवस्थित पकडता येते, तसंच बॉल मैदानाबाहेर पाठवायलाही मदत होते.

पोलार्डने त्याच्या टी-20 कारकिर्दीमध्ये एकूण 682 सिक्स लगावले आहेत. त्याने मारलेल्या फोरपेक्षा सिक्सची संख्या जास्त आहे. पोलार्डच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये एकूण 664 फोर आहेत.

Published by: Shreyas
First published: October 2, 2020, 8:38 AM IST

ताज्या बातम्या