Home /News /sport /

IPL 2020 : ब्राव्होच्या विकेटनंतर सेलिब्रेशनमुळे वाद, खलीलने दिलं स्पष्टीकरण

IPL 2020 : ब्राव्होच्या विकेटनंतर सेलिब्रेशनमुळे वाद, खलीलने दिलं स्पष्टीकरण

आयपीएल (IPL 2020) च्या हैदराबाद (SRH) आणि चेन्नई (CSK) यांच्यात झालेल्या मॅचवेळी खलील अहमदने केलेल्या सेलिब्रेशनवर सोशल मीडियावर टीका करण्यात येत आहे. खलील अहमद (Khaleel Ahmed)ने ड्वॅन ब्राव्हो (Dwayne Bravo) ची पहिल्या बॉलवरच विकेट घेतली.

पुढे वाचा ...
    अबु धाबी, 17 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) च्या हैदराबाद (SRH) आणि चेन्नई (CSK) यांच्यात झालेल्या मॅचवेळी खलील अहमदने केलेल्या सेलिब्रेशनवर सोशल मीडियावर टीका करण्यात येत आहे. खलील अहमद (Khaleel Ahmed)ने ड्वॅन ब्राव्हो (Dwayne Bravo) ची पहिल्या बॉलवरच विकेट घेतली. ब्राव्होला गोल्डन डकवर पॅव्हेलियनमध्ये पाठवल्यानंतर खलीलने केलेला जल्लोष वादात सापडला. यानंतर अखेर खलील अहमदने या वादावर स्पष्टीकरण दिलं आहे. आयपीएलची 29वी मॅच चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)यांच्यात खेळवण्यात आली. चेन्नईच्या बॅटिंगवेळी 20व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर खलीलने ड्वॅन ब्राव्होची विकेट घेतली. ब्राव्होची विकेट घेतल्यानंतर खलीलने सेलिब्रेशन केलं नाही, पण तो ब्राव्होकडे बघून हसला. खलीलच्या या हास्यावर सोशल मीडियावर आक्षेप घेण्यात आला आणि त्याच्यावर टीकाही करण्यात आली. सोशल मीडियावर होत असलेल्या या टीकेनंतर खलील अहमदने प्रतिक्रिया दिली आहे. 'मी ब्राव्होवर हसलो नाही, माझ्या हसण्याचं कारण वेगळं होतं. ब्राव्हो महान खेळाडू आहे आणि तो मला मोठ्या भावाप्रमाणे आहे,' असं ट्विट खलील अहमदने केलं आहे. khaleel Ahmed, SRH, IPL 2020 चेन्नईचा या मॅचमध्ये 20 रनने विजय झाला, यामुळे त्यांचं प्ले-ऑफसाठीचं आव्हान कायम आहे. या मॅचमध्ये शेन वॉटसन आणि अंबाती रायुडू यांच्यात 81 रनची पार्टनरशीप झाली. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतल्यानंतर चेन्नईने 167 रन केल्या. चेन्नईच्या या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने 147 रन करुन 8 विकेट गमावल्या. केन विलियमसनने हैदराबादसाठी 39 बॉलमध्ये सर्वाधिक 57 रन केले. चेन्नई सुपर किंग्जचा यंदाच्या मोसमातला हा तिसरा विजय होता. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईची टीम सध्या सहाव्या क्रमांकावर आहे. धोनीच्या टीमचा 8 पैकी 5 सामन्यांमध्ये पराभव झाला, त्यामुळे प्ले-ऑफमध्ये पोहचण्यासाठी चेन्नईला खडतर आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या