Home /News /sport /

IPL 2020 : आयपीएल अर्धवट सोडून दिग्गज खेळाडू घरी परतला

IPL 2020 : आयपीएल अर्धवट सोडून दिग्गज खेळाडू घरी परतला

आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमाच्या सुरुवातीलाच चेन्नईचा दिग्गज खेळाडू सुरेश रैना युएईतून भारतात परतला. हरभजन सिंग आणि लसिथ मलिंगा यांनीही यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतली. आता आणखी एक दिग्गज खेळाडू आयपीएल अर्धवट सोडून मायदेशी परतला आहे.

पुढे वाचा ...
    दुबई, 16 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमाच्या सुरुवातीलाच चेन्नईचा दिग्गज खेळाडू सुरेश रैना युएईतून भारतात परतला. हरभजन सिंग आणि लसिथ मलिंगा यांनीही यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतली. आता आणखी एक दिग्गज खेळाडू आयपीएल अर्धवट सोडून मायदेशी परतला आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसन (Kevin Pietersen) पुन्हा त्याच्या घरी गेला आहे. केव्हिन पीटरसन या आयपीएलमध्ये कॉमेंट्री करत होता. युएई सोडून तो पुन्हा इंग्लंडला गेला आहे. मुलांमुळे आपण आयपीएल अर्ध्यावर सोडून चालल्याचं पीटरसनने सांगितलं. मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी इंग्लंडला परत जात असल्याचं ट्विट पीटरसनने केलं. लोकप्रिय गायिका जेसिका टेलर पीटरसनची पत्नी आहे, या दोघांना दोन मुलं आहेत. पीटरसन पंजाब आणि बँगलोरविरुद्ध गुरुवारी झालेल्या मॅचवेळी कॉमेंट्री करत होता. या मॅचमध्ये पंजाबच्या शेवटच्या बॉलवर विजय झाला. पीटरसनने या आयपीएलमध्ये चेन्नईचा खेळाडू अंबाती रायुडूवर टीका केली होती. रायुडू खूप हळू रन काढत असल्यामुळे पीटरसनने त्याच्यावर निशाणा साधला होता. रायुडूला झोपेतून उठायची गरज आहे, त्याने डिव्हिलियर्स, डुप्लेसी आणि वॉर्नर यांच्यासारख्या खेळाडूंकडून शिकावं, असा सल्ला पीटरसनने दिला होता.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या