Home /News /sport /

IPL 2020 : केदार जाधव पुन्हा झाला ट्रोल, पाहा आता काय आहे कारण

IPL 2020 : केदार जाधव पुन्हा झाला ट्रोल, पाहा आता काय आहे कारण

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात चेन्नई (CSK)ची कामगिरी निराशाजनक झाली आहे. त्यामुळे टीमचे चाहतेही त्यांच्यावर चांगलेच नाराज झाले आहेत. सोशल मीडियावर टीमच्या खेळाडूंवर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात येत आहे. यात केदार जाधव (Kedar Jadhav)चं नाव आघाडीवर आहे.

पुढे वाचा ...
    दुबई, 21 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात चेन्नई (CSK)ची कामगिरी निराशाजनक झाली आहे. त्यामुळे टीमचे चाहतेही त्यांच्यावर चांगलेच नाराज झाले आहेत. सोशल मीडियावर टीमच्या खेळाडूंवर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात येत आहे. यात केदार जाधव (Kedar Jadhav)चं नाव आघाडीवर आहे. या हंगामात केदारने 8 मॅचमध्ये 20.66 च्या सरासरीने फक्त 62 रन केले आहेत. यात त्याचा स्ट्राइक रेट फक्त 93.93 एवढाच आहे. केदार जाधवला आपल्या टीमसाठी तितक्या चांगल्या प्रकारे खेळता आलं नाही. मधल्या फळीत मैदानात उतरणाऱ्या खेळाडूने खेळ संपवूनच मैदानाबाहेर पडावं अशी अपेक्षा असते. परंतु केदारची कामगिरी खराब झाली आहे. सोमवारी झालेल्या चेन्नई आणि राजस्थानच्या सामन्यात केदार जाधवने 7 बॉलमध्ये फक्त 4 रन केले. टॉस जिंकून पहिले बॅटिंग करत असलेल्या चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 125 रनच करता आल्या. आयपीएलच्या सुरुवातीपासूनच केदार जाधवकडून चेन्नईच्या चाहत्यांना खूपच अपेक्षा होती, पण त्यांची निराशा झाली. सोमवारच्या मॅचनंतर केदार जाधवबाबत खूपच मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसंच धोनीचं जुन्या खेळाडूंबाबतच्या प्रेमामुळे चाहत्यांमध्ये अजूनच संताप वाढला आहे. रामायण मालिकेतून फोटो टाकून काहींनी त्यावर लिहिलंय ‘निर्लज्ज तू फिर आगया.’ आतापर्यंत फक्त दोन सामने खेळू शकलेला महाराष्ट्राचा खेळाडू ऋतुराज गायकवाड, एन. जगदीश या दोघांनाही पुन्हा संधी द्यावी, अशी इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या