Home /News /sport /

IPL 2020 : मैदानात नेहमीच शांत असणारा केन विलियमसन रागाने लाल झाला

IPL 2020 : मैदानात नेहमीच शांत असणारा केन विलियमसन रागाने लाल झाला

(फोटो- IPL/BCCI)

(फोटो- IPL/BCCI)

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) ला क्रिकेटच्या मैदानात सगळ्यांनीच कायम शांत आणि हसताना पाहिलं आहे.

    दुबई, 3 ऑक्टोबर : न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) ला क्रिकेटच्या मैदानात सगळ्यांनीच कायम शांत आणि हसताना पाहिलं आहे. पण आयपीएल (IPL 2020)मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)यांच्यातल्या सामन्यामध्ये केन विलियमसनचा पारा चढललेला पाहायला मिळाला. हैदराबादची बॅटिंग सुरु असताना 11 व्या ओव्हरला विलियमसन रन आऊट झाला. स्वस्तात आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये जाताना केन विलियमसन रागाने लाल झाला. केन विलियमसनला रन आऊट करण्यात प्रियम गर्गची चूक होती. प्रियमने विलियमसनला रन काढण्यासाठी बोलावलं आणि मग नकार दिला. हो-नाहीच्या या गोंधळामध्ये विलियमसनला पॅव्हेलियनमध्ये परत जावं लागलं. काय म्हणाला प्रियम गर्ग? मॅच संपल्यानंतर प्रियम गर्गने या घटनेवर भाष्य केलं. विलियमसनसारखा बॅट्समन माझ्यामुळे रन आऊट झाल्याने मला वाईट वाटलं. डग आऊटमध्ये गेल्यानंतर केन विलियमसन मला अजिबात रागावला नाही. उलट जे झालं, ते विसरून जा, असं म्हणाल्याचं प्रियम गर्गने सांगितलं. सोबतच त्याने मला शाबासकीही दिली आणि आता फिल्डिंगमध्ये काय होतंय, ते बघू, असं केन मला म्हणाल्याचं प्रियमने मॅचनंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं. गर्गने मॅच फिरवली केन विलियमसन रन आऊट झाल्यानंतर हैदराबादची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. फक्त 69 रनवरच हैदराबादच्या 4 विकेट गेल्या होत्या. जॉनी बेयरस्टो, डेव्हिड वॉर्नर, मनिष पांडे आणि केन विलियमसन यांच्यासारखे दिग्गज खेळाडू आऊट झाले होते त्यामुळे हैदराबादला मोठी धावसंख्या उभारता येणार नाही, असं वाटत होतं. पण प्ररियम गर्गने 51 रनची खेळी केली. गर्ग आणि अभिषेक शर्मा यांच्यात 77 रनची पार्टनरशीप झाली. यामुळे हैदराबादने चेन्नईला विजयासाठी 164 रनचं आव्हान ठेवलं. प्रियम गर्गच्या या अर्धशतकी खेळीमुळे हैदराबादने चेन्नईवर 7 रनने विजय मिळवला.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या