Home /News /sport /

IPL 2020 : सलग 19 मॅच... सातत्य असावं तर असं! रबाडाचं स्पेशल रेकॉर्ड

IPL 2020 : सलग 19 मॅच... सातत्य असावं तर असं! रबाडाचं स्पेशल रेकॉर्ड

आयपीएल (IPL 2020)च्या बैंगलोर (Royal Challengers Bangalore)विरुद्धच्या सामन्यात दिल्ली (Delhi Capitals)चा 59 रननी विजय झाला. कगिसो रबाडा (Kagiso Rabada) ने या विजयात मोलाची भूमिका बजावली.

    दुबई, 6 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या बैंगलोर (Royal Challengers Bangalore)विरुद्धच्या सामन्यात दिल्ली (Delhi Capitals)चा 59 रननी विजय झाला. याचसोबत पॉईंट्स टेबलमध्ये दिल्लीची टीम पहिल्या क्रमांकावर पोहोचली. या मॅचमध्ये दिल्लीचा बॉलर कागिसो रबाडा (Kagiso Rabada)ने 4 विकेट घेत दिल्लीच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. रबाडाने 4 ओव्हरमध्ये 24 रन देऊन बैंगलोरच्या 4 बॅट्समनना माघारी धाडलं. यामध्ये कर्णधार विराट कोहली आणि शिवम दुबे यांचादेखील समावेश होता. आयपीएलमध्ये सलग 19 सामन्यांमध्ये किमान एक विकेट घेण्याचा विक्रम आतापर्यंत विनय कुमारच्या नावावर होता. रबाडाने कालच्या सामन्यात या विक्रमाची बरोबरी केली. आयपीएलमध्ये सलग 19 सामन्यात या दोघांनी एकतरी विकेट घेतली आहे. या दोघांनंतर लसिथ मलिंगा आणि युझवेंद्र चहल आहेत. लसिथ मलिंगाने सलग 17 सामन्यांमध्ये तर चहलने सलग 15 सामन्यांमध्ये एकतरी विकेट घेतली आहे. त्यामुळे आता पुढील सामन्यात रबाडाने एक विकेट घेताच आयपीएलच्या सलग 20 सामन्यात विकेट घेणारा तो एकमेव बॉलर ठरणार आहे. त्याचबरोबर बंगलोरचा चहलही या आयपीएलमध्ये उत्तम प्रदर्शन करत आहे, त्यामुळे त्यालादेखील हा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. या आयपीएलमध्ये कगिसो रबाडा फुल फॉर्ममध्ये आहे. प्रत्येक सामन्यात त्याने विकेट घेतली आहे. त्यामुळे पुढील सामन्यात तो हा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. या आयपीएलमधील पहिल्या सामन्यात त्याने किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध 2 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध त्याने 3 विकेट घेत आपला फॉर्म कायम राखला. दिल्लीने या सामन्यात 44 रननी विजय मिळवत चेन्नईचा पराभव केला होता. तिसऱ्या सामन्यात रबाडाने सनरायजर्स हैदराबादच्या 2 बॅट्समनना माघारी धाडलं, पण या सामन्यात दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर चौथ्या सामन्यात त्याने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 1 विकेट घेतली होती. यामध्ये दिल्लीने 18 रननी कोलकात्याच्या पराभव केला होता. याचबरोबर कालच्या सामन्यात चार विकेट घेत त्याने हा रेकॉर्ड केला.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या