IPL 2020 : क्रिस गेलबाबत आर्चरने 7 वर्षांपूर्वीच केली होती भविष्यवाणी

IPL 2020 : क्रिस गेलबाबत आर्चरने 7 वर्षांपूर्वीच केली होती भविष्यवाणी

जोफ्रा आर्चर (Jofra Archer) हा त्याच्या ट्विटर अकाऊंटमुळे कायमच चर्चेत असतो. शुक्रवारी आयपीएल (IPL 2020)मध्ये पंजाब (KXIP)विरुद्धच्या मॅचनंतरही आर्चरचं 7 वर्ष जुनं ट्विट व्हायरल झालं आहे.

  • Share this:

दुबई, 31 ऑक्टोबर : इंग्लंडचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर (Jofra Archer) हा त्याच्या ट्विटर अकाऊंटमुळे कायमच चर्चेत असतो. आतापर्यंत अनेकवेळा जोफ्रा आर्चरने भूतकाळात वर्तवलेली भविष्य काही वर्षानंतर खरी ठरत असल्याचं अनेकवेळा दिसून आलं आहे. कोणत्याही मॅचनंतर जोफ्रा आर्चरची जुनी ट्विट त्याचे चाहते व्हायरल करतात आणि सध्याच्या घटनेला ती जोडली जातात. शुक्रवारी आयपीएल (IPL 2020)मध्ये पंजाब (KXIP)विरुद्धच्या मॅचनंतरही आर्चरचं 7 वर्ष जुनं ट्विट व्हायरल झालं आहे.

काय म्हणाला होता आर्चर?

जोफ्रा आर्चरने 22 फेब्रुवारी 2013 साली रात्री 10.30 वाजता एक ट्विट केलं होतं, ज्यामध्ये त्याने लिहिलं होतं, 'मी जर बॉलिंग करत असतो, तर क्रिस गेलला शतक पूर्ण करू दिलं नसतं.' शुक्रवारीही अगदी तसंच झालं. मॅचच्या 19 व्या ओव्हरमध्ये आर्चरच्या तिसऱ्या बॉलवर सिक्स मारून क्रिस गेल (Chris Gayle) 99 रनवर पोहोचला. गेलला शतक करण्यासाठी फक्त 1 रन हवी होती, पण आर्चरने त्याला बोल्ड केलं.

आऊट झाल्यानंतर क्रिस गेल थोडा संतापलेलाही पाहायला मिळाला, त्याने बॅट मिड विकेटच्या दिशेने भिरकावून दिली. पण पॅव्हेलियनमध्ये परतताना आर्चरने गेलसोबत हात मिळवला. आर्चरने हा फोटो ट्विट केला आहे आणि गेल अजूनही बॉस असल्याचं आर्चर या ट्विटमध्ये म्हणाला आहे. पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये केलेल्या शानदार बॉलिंगमुळे आर्चरने राजस्थान (Rajasthan Royals) चे प्ले-ऑफचं स्वप्न अजून कायम ठेवलं आहे.

Published by: Shreyas
First published: October 31, 2020, 4:31 PM IST
Tags:

ताज्या बातम्या