IPL 2020 : बुमराहचा स्पेशल रेकॉर्ड, दोन्ही वेळा शिकार विराटच

IPL 2020 : बुमराहचा स्पेशल रेकॉर्ड, दोन्ही वेळा शिकार विराटच

IPL 2020 बँगलोर (RCB)विरुद्धच्या सामन्यात मुंबई (Mumbai Indians)चा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)ने नवीन रेकॉर्ड केला आहे.

  • Share this:

अबु धाबी, 28 ऑक्टोबर : बँगलोर (RCB)विरुद्धच्या सामन्यात मुंबई (Mumbai Indians)चा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)ने नवीन रेकॉर्ड केला आहे. आयपीएलमध्ये बुमराहने 100 विकेटचा टप्पा ओलांडला आहे. बँगलोरचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) बुमराहची 100वी विकेट होती. योगायोग म्हणजे बुमराहची पहिली विकेटही विराट कोहलीच होता.

जसप्रीत बुमराहने 89 आयपीएल सामन्यांमध्ये 102 विकेट घेतल्या आहेत. आयपीएल (IPL 2020)मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत बुमराह 15व्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये मुंबईचाच लसिथ मलिंगा पहिल्या क्रमांकावर आहे.

बँगलोरविरुद्धच्या आजच्या मॅचमध्ये बुमराहने भेदक बॉलिंग केली. देवदत्त पडिकल आणि जॉश फिलिप यांनी बँगलोरला 7.5 ओव्हरमध्येच 71 रनची ओपनिंग पार्टनरशीप करुन दिली होती. त्यामुळे बँगलोरचा स्कोअर 200 रनपर्यंत जाईल असं वाटत होतं, पण बुमराहने 4 ओव्हरमध्ये फक्त 14 रन देऊन 3 विकेट घेतल्या. बुमराहने देवदत्त पडिकल, विराट कोहली आणि शिवम दुबे यांना माघारी धाडलं.

यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलरच्या यादीत बुमराह दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. 12 मॅचमध्ये त्याने 7.18 चा इकोनॉमी रेट आणि 17.25च्या सरासरीने 20 विकेट घेतल्या आहेत. या यादीमध्ये दिल्लीचा कगिसो रबाडा पहिल्या क्रमांकावर आहे. रबाडाने 12 मॅचमध्ये 8.13 चा इकोनॉमी रेट आणि 16.86 च्या सरासरीने 23 विकेट घेतल्या आहेत.

Published by: Shreyas
First published: October 28, 2020, 11:25 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading