मुंबई, 05 नोव्हेंबर: आयपीएल स्पर्धेत (IPL 2020) आज पहिला क्वालिफायर सामना खेळला जाणार आहे. ज्यांचं पारडं टूर्नामेंटच्या सुरुवातीपासूनच जड आहे अशी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि या हंगामात सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्समध्ये (Delhi Capitals) पहिला क्वालिफायर सामना होणार आहे. दरम्यान सामन्याआधी जसप्रीत बुमराहने त्याचा लुक चेंज केला आहे. त्याबाबतचा एक व्हिडीओ बुमराहने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. एवढंच नव्हे तर हा व्हिडीओ पोस्ट करताना त्याने प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) ला देखील चॅलेंज दिले आहे. #BreakTheBeard चॅलेंज घेत सध्या अनेक क्रिकेटर्सनी त्यांचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. बुमराहने देखील त्याचा नवा लुक पोस्ट केला आहे.
यामध्ये त्याने तो आणि त्याची पलटण सामन्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. तर श्रेयसला तो मैदानात भेटू असं म्हणाला आहे.
दरम्यान बुमराहच्या या चॅलेंजला श्रेयसने देखील याच शैलीत उत्तर दिले आहे. 'ब्रेक द बिअर्ड' चॅलेंजचा एक व्हिडीओ श्रेयसने देखील पोस्ट केला आहे. यामध्ये श्रेयसने 'स्वागत नही करोगें हमारा' असं म्हणत बुमराहलाच उलट सवाल केला आहे. बुमराहने देखील यावर कमेंट करून म्हटले आहे की, 'अजिबात निराश झालो नाही'.
या दोन्ही खेळाडूनी #GameFaceOn असा हॅशटॅग वापरून हे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. सोशल मीडियावर एकमेकांची गंमत करण सुरू असलं तरी खऱ्या मैदानात हे दोन प्रतिस्पर्धी कसा एकमेकांशी सामना करतात हे पाहणं रंजक ठरणार आहे.
(हे वाचा-IPL 2020, 1st Qualifier: कोण जिंकणार फायनलचं तिकिट? आज मुंबई-दिल्ली आमनेसामने)
या हंगामात दिल्ली आणि मुंबईने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही सामन्यात मुंबईचा विजय झाला आहे. त्यामुळे मुंबईचं पारडं जड असलं तरीही दिल्लीचा या हंगामात कामगिरीची ग्राफ चांगला आहे. त्यामुळे आजचा सामना चुरशीचा होणार एवढं मात्र नक्की.