IPL 2020 : पहिल्याच मॅचमध्ये होल्डर चमकला, राजस्थानचं हैदराबादला 155 रनचं आव्हान

IPL 2020 : पहिल्याच मॅचमध्ये होल्डर चमकला, राजस्थानचं हैदराबादला 155 रनचं आव्हान

आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमातली आपली पहिलीच मॅच खेळणारा जेसन होल्डर (Jason Holder) चांगलाच चमकला आहे. हैदराबाद (SRH) विरुद्धच्या मॅचमध्ये राजस्थान (Rajasthan Royals) ने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 154 रन केले.

  • Share this:

दुबई, 22 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमातली आपली पहिलीच मॅच खेळणारा जेसन होल्डर (Jason Holder) चांगलाच चमकला आहे. हैदराबाद (SRH) विरुद्धच्या मॅचमध्ये राजस्थान (Rajasthan Royals) ने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 154 रन केले. जेसन होल्डरने 4 ओव्हरमध्ये 33 रन देऊन 4 विकेट घेतल्या आणि एक रन आऊटही केला. तर विजय शंकर आणि राशिद खानला एक-एक विकेट मिळाली. राजस्थानकडून संजू सॅमसनने सर्वाधिक 36 रन केले. बेन स्टोक्स याला त्याच्या 30 रनसाठी संघर्ष करावा लागला.

प्ले-ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी या दोन्ही टीमना ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. या मॅचमध्ये हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचमध्ये हैदराबादने दोन बदल केले आहेत. केन विलियमसनच्या ऐवजी जेसन होल्डर आणि बसिल थम्पीच्या ऐवजी शाहबाज नदीमला संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे राजस्थानच्या टीमने कोणताही बदल केलेला नाही.

पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थानची टीम सहाव्या आणि हैदराबादची टीम सातव्या क्रमांकावर आहे. राजस्थानने 10 पैकी 4 मॅच जिंकल्या आहेत, तर हैदराबादला 9 पैकी फक्त 3 मॅच जिंकता आल्या आहेत.

हैदराबादची टीम

डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेयरस्टो, प्रियम गर्ग, मनिष पांडे, विजय शंकर, अब्दुल समद, जेसन होल्डर, राशिद खान, शाहबाज नदीम, संदीप शर्मा, टी नटराजन

राजस्थानची टीम

बेन स्टोक्स, रॉबिन उथप्पा, संजू सॅमसन, स्टीव्ह स्मिथ, जॉस बटलर, रियान पराग, राहुल तेवतिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाळ, अंकित राजपूत, कार्तिक त्यागी

Published by: Shreyas
First published: October 22, 2020, 7:17 PM IST
Tags:

ताज्या बातम्या