Home /News /sport /

IPL 2020 : आकाश चोप्राच्या टीकेला जेम्स नीशमचं प्रत्युत्तर, दोघांची ट्विटरवर बाचाबाची

IPL 2020 : आकाश चोप्राच्या टीकेला जेम्स नीशमचं प्रत्युत्तर, दोघांची ट्विटरवर बाचाबाची

आयपीएल (IPL 2020)मध्ये न्यूझीलंडचा ऑलराऊंडर जेम्स नीशम (James Neesham)किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab)कडून खेळत आहे.

    दुबई : आयपीएल (IPL 2020)मध्ये न्यूझीलंडचा ऑलराऊंडर जेम्स नीशम (James Neesham)किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab)कडून खेळत आहे. पंजाबकडून खेळताना नीशमने 3 मॅचमध्ये 105 रन देऊन फक्त एक विकेटच मिळवली आहे. आयपीएलच्या या मोसमात नीशमची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. नीशमला पंजाबच्या टीममधून खेळवण्यावरुन माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर आकाश चोप्राने नाराजी जाहीर केली आहे. आकाश चोप्राने पंजाबच्या टीम निवडीवरच प्रश्न उपस्थित केले आहेत. नीशमच्याऐवजी मुजीब उर रहमानला पंजाबने खेळवलं पाहिजे, असं मत आकाश चोप्राने मांडलं. आकाश चोप्राच्या या टीकेला जेम्स नीशम याने ट्विटरवर उत्तर दिलं, यानंतर आकाश चोप्रानेही नीशमला प्रत्युत्तर दिलं. जेम्स नीशमने बैंगलोरविरुद्धच्या दुसऱ्या मॅचमध्ये 2 ओव्हरमध्ये 13 रन देऊन एकही विकेट घेतली नाही, तर राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये त्याने 4 ओव्हरमध्ये 40 रन देऊन 1 विकेट घेतली. मुंबईविरुद्धच्या चौथ्या मॅचमध्ये त्याला 4 ओव्हरमध्ये 52 रन देऊन एकही विकेट मिळाली नाही. तर या 3 मॅचमध्ये बॅटिंग करताना नीशमला 7 रनच करता आल्या आहेत. मुंबईविरुद्ध पंजाबच्या पराभवाची समीक्षा करताना आकाश चोप्रा म्हणाला, 'परदेशी खेळाडू म्हणून नीशमला खेळवलं जात आहे, पण तो पॉवर प्लेमध्ये बॉलिंग करु शकत नाही आणि शेवटच्या काही ओव्हरमध्येही नाही. तो महान फिनिशरही नाही किंवा टॉप 4-5 मध्येही बॅटिंग करु शकत नाही. मग पंजाब त्याला का खेळवत आहे? मॅच विनर नसलेल्या खेळाडूला तुम्ही खेळवत आहात.' जेम्स नीशमने आकाश चोप्राच्या रेकॉर्डवर भाष्य करत निशाणा साधला. '18.5 ची सरासरी आणि 90च्या स्ट्राईक रेटनेही जास्त मॅच जिंकता येत नाहीत,' असं नीशम म्हणाला. आकाश चोप्राने त्याच्या टी-20 कारकिर्दीत 21 मॅचमध्ये 18.55 च्या सरासरीने 91.25च्या स्ट्राईक रेटने 334 रन केले होते. James Neesham, Aakash Chopra, Twitter जेम्स नीशमच्या या ट्विटला आकाश चोप्रानेही प्रत्युत्तर दिलं. 'बरोबर बोललास मित्रा. म्हणूनच कोणीही मला आपल्या टीममध्ये घेत नाही. मला काही तरी वेगळंच करण्याचे पैसे मिळतात. मला आनंद आहे की माझ्या समीक्षेबाबत तुला काही आक्षेप नाही, तर माझ्या क्रिकेटच्या रेकॉर्डवर आहे. आयपीएलमध्ये पुढे चांगली कामगिरी कर,' असं आकाश चोप्रा म्हणाला आहे. James Neesham Aakash Chopra Twitter आकाश चोप्राने त्याच्या युट्युब चॅनलवर पंजाबने नीशमच्याऐवजी मुजीब उर रहमानला खेळवलं पाहिजे, असं मत मांडलं होतं. पंजाब योग्य टीम मैदानात उतरवत नाही. जगातली ही एकमेव टीम आहे ज्यात मुजीबला बाहेर ठेवण्यात आलं आहे, असं वक्तव्य आकाश चोप्राने केलं होतं.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या