Home /News /sport /

'काहींसाठी वय फक्त आकडा, पण दुसऱ्यांसाठी...', भारतीय खेळाडूंचाच धोनीवर निशाणा

'काहींसाठी वय फक्त आकडा, पण दुसऱ्यांसाठी...', भारतीय खेळाडूंचाच धोनीवर निशाणा

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super kings)ची कामगिरी निराशाजनक झाली आहे. शुक्रवारी हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध झालेल्या मॅचमध्येही चेन्नईला पराभव पत्करावा लागला.

    अबु धाबी, 3 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super kings)ची कामगिरी निराशाजनक झाली आहे. शुक्रवारी हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध झालेल्या मॅचमध्येही चेन्नईला पराभव पत्करावा लागला. चेन्नईचा यंदाच्या मोसमातला हा तिसरा पराभव आहे. मुंबईविरुद्धची पहिली मॅच जिंकल्यानंतर चेन्नईला लागोपाठ 3 मॅचमध्ये पराभवाचं तोंड पाहायला लागलं. यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण (Irfan Pathan) याने धोनीवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईचा 7 रननी पराभव झाला. हैदराबादने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतल्यावर त्यांचे सुरुवातीचे 4 बॅट्समन स्वस्तात माघारी परतले. यानंतर प्रियम गर्ग आणि अभिषेक शर्मा यांनी स्थिती सावरली आणि टीमला 164 रनपर्यंत पोहोचवलं. हैदराबादने ठेवलेल्या 165 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला 157 रन करता आल्या. या मॅचच्या शेवटच्या काही ओव्हरमध्ये धोनी संघर्ष करताना दिसला. 39 वर्षांच्या धोनीला युएईमधल्या गरमीचा त्रास होत होता. अखेर चेन्नईच्या मेडिकल टीमला धोनीवर उपचार करण्यासाठी मैदानात यावं लागलं. या मॅचनंतर इरफान पठाणने केलेलं ट्विट सध्या चर्चेत आलं आहे. 'काही जणांसाठी वय हा फक्त आकडा असतो, तर दुसऱ्यांसाठी टीममधून काढलं जाण्याचं कारण,' असं इरफान म्हणाला. इरफान पठाणच्या या ट्विटवर हरभजन सिंगनेही प्रतिक्रिया दिली आहे. मी तुझ्या म्हणण्याशी सहमत आहे, अशी कमेंट हरभजनने केली आहे. आयपीएल सुरु व्हायच्या आधीच सुरेश रैना आणि हरभजन सिंग या दोन्ही दिग्गजांनी स्पर्धेतून माघार घेतली, ज्याचा मोठा फटका चेन्नईला बसला.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या