IPL 2020 : रोहितचा सराव जोरात, प्ले-ऑफ खेळणार? टीम इंडियामध्येही संधी?

IPL 2020 : रोहितचा सराव जोरात, प्ले-ऑफ खेळणार? टीम इंडियामध्येही संधी?

आयपीएल (IPL 2020)च्या प्ले-ऑफआधी मुंबई (Mumbai Indians)साठी दिलासादायक बातमी आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) याने रविवारी नेटमध्ये जोरदार सराव केला.

  • Share this:

दुबई, 1 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020)च्या प्ले-ऑफआधी मुंबई (Mumbai Indians)साठी दिलासादायक बातमी आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) याने रविवारी नेटमध्ये जोरदार सराव केला. रोहित शर्माच्या डाव्या मांडीच्या मांसपेशींना दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला 4 मॅचना मुकावं लागलं होतं. पण पंजाब आणि चेन्नई यांच्यात सुरु असलेल्या मॅचदरम्यान रोहित शर्माच्या सरावाचे फोटो दाखवण्यात आले. यामध्ये रोहित त्याच्या दुखापत झालेल्या डाव्या पायाचा वापर करुन शानदार ड्राईव्ह मारताना दिसत होता. त्यामुळे रोहित शर्मा फिट झाला आहे का? रोहित फिट झाला असेल, तर तो प्ले-ऑफमध्ये खेळणार का? तसंच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याला पुन्हा टीममध्ये घेतलं जाणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. याच दुखापतीमुळे रोहितची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या भारतीय टीममध्ये निवड झाली नव्हती.

मुंबई आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवणारी पहिली टीम ठरली होती. पण प्ले-ऑफसाठी रोहित शर्माने प्ले-ऑफसाठी अजून कोणतीही रणनीती बनवलेली नाही. मुंबईने 13 पैकी 9 मॅच जिंकल्यामुळे त्यांच्या खात्यात 18 पॉईंट्स आहेत. दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये 9 विकेटने विजय मिळवत मुंबई पहिल्या क्रमांकावर कायम राहणार हे निश्चित झालं. लीगमध्ये मुंबईचा शेवटचा सामना हैदराबादविरुद्ध मंगळवारी होणार आहे.

रोहित शर्माने मुंबईच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन रोहितची प्रतिक्रिया दिली आहे. 'आम्ही पहिला अडथळा पार केला आहे, आता दुसऱ्या छोट्या स्पर्धेत (प्ले-ऑफ) खेळायचं आहे. त्याआधी हैदराबादविरुद्धची मॅचही आहे. आम्ही समोरच्या टीमबाबत फारसा विचार करत नाही, फक्त चांगला खेळ पुढेही सुरू ठेवणं हेच आमचं लक्ष्य आहे,' असं रोहित म्हणाला.

दुखापतीमुळे रोहित मागच्या 4 मॅचमध्ये खेळू शकला नव्हता, हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्येही रोहितच्या खेळण्याची शक्यता कमी आहे. कारण या मॅचच्या निकालाचा मुंबईच्या भवितव्यावर काहीही परिणाम होणार नाही.

दुसरीकडे टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रोहित शर्माला सल्ला दिला आहे. रोहितची दुखापत वाढू शकते आणि यात रोहितचंच नुकसान होऊ शकतं, असा रिपोर्ट बीसीसीआयच्या मेडिकल टीमने दिला आहे, त्यामुळे रोहितने पुनरागमनाची घाई करु नये, असं रवी शास्त्री म्हणाले. तसंच टीम इंडियाच्या निवडीच्या प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नसतो, असंही शास्त्री यांनी स्पष्ट केलं.

Published by: Shreyas
First published: November 1, 2020, 8:26 PM IST
Tags:

ताज्या बातम्या