IPL 2020 : यंदाच्या मोसमात सर्वाधिक 16 सिक्स मारणारा खेळाडू आता ठरतोय फ्लॉप

IPL 2020 : यंदाच्या मोसमात सर्वाधिक 16 सिक्स मारणारा खेळाडू आता ठरतोय फ्लॉप

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध 32 बॉलमध्ये 74 रन, किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध 42 बॉलमध्ये 85 रन. या दोन वादळी खेळीनंतर संजू सॅमसन (Sanju Samson)ने आयपीएल (IPL 2020)च्या मॅच गाजवल्या. यानंतर मात्र 25 वर्षांच्या या खेळाडूने राजस्थान (Rajasthan Royals)आणि त्याच्या चाहत्यांची निराशा केली.

  • Share this:

अबु धाबी, 7 ऑक्टोबर : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध 32 बॉलमध्ये 74 रन, किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध 42 बॉलमध्ये 85 रन. या दोन वादळी खेळीनंतर संजू सॅमसन (Sanju Samson)ने आयपीएल (IPL 2020)च्या मॅच गाजवल्या. यानंतर मात्र 25 वर्षांच्या या खेळाडूने राजस्थान (Rajasthan Royals)आणि त्याच्या चाहत्यांची निराशा केली. प्रत्येक मॅचमध्ये आता संजू सॅमसन रनसाठी तरसतोय. क्रिकेट तज्ज्ञांनाही आता संजू सॅमसनच्या बॅटिंगमध्ये उणीवा दिसायला लागल्या आहेत. तर सोशल मीडियावरही सॅमसनला ट्रोल करण्यात येत आहे. शारजाहसारख्या छोट्या मैदानावरच संजू सॅमसन रन बनवत आहे, अशी टीका त्याच्यावर होत आहे. सॅमसनच्या या फॉर्ममुळे त्याचा कर्णधार आणि प्रशिक्षकाचं टेन्शन मात्र नक्कीच वाढलं असेल.

संजू सॅमसनचा फ्लॉप शो

मंगळवारी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)विरुद्धच्या मॅचमध्ये संजू सॅमसन एकही रन न करता आऊट झाला. 74 आणि 85 रनची धमाकेदार खेळी केल्यानंतर सॅमसन 8, 4 आणि 0 रन करून माघारी परतला आहे. मागच्या 3 इनिंगमध्ये त्याला फक्त 15 बॉल खेळता आले आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक 16 सिक्स मारण्याचा विक्रम संजू सॅमसनच्या नावावर आहे, पण आता एक-एक रन काढण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागतोय.

राजस्थानने त्यांच्या पहिल्या दोन्ही मॅच शारजाहच्या मैदानात खेळल्या होत्या. या मैदानावर बाऊंड्रीचं अंतर अत्यंत कमी आहे. याच मैदानावर सॅमसनने तुफान फटकेबाजी केली होती. पण राजस्थानच्या मॅच दुबई आणि अबु धाबीमध्ये झाल्यानंतर मात्र सॅमसनची बॅट शांतच राहिली.

कुठे होत आहे चूक?

आयपीएलच्या लागोपाठ तिसऱ्या मोसमात सुरुवातीला रन केल्यानंतर सॅमसन अपयशी ठरत आहे. आकड्यांवर नजर टाकली तर सॅमसनने 2018 आणि 2019 साली 40 टक्के रन पहिल्या 3 मॅचमध्ये केल्या होत्या. यानंतर प्रत्येकवेळी रनसाठी झगडताना दिसला. तज्ज्ञांच्या मते सॅमसनला उसळणाऱ्या बॉलवर खेळायला त्रास होत आहे. शारजाहच्या छोट्या मैदानावर या उणीवा दिसल्या नाहीत, कारण खराब पूल शॉटवरही या मैदानात सिक्स मिळत होती. मोठ्या मैदानात मात्र तो याच शॉटवर आऊट होत आहे.

राजस्थान संकटात

सॅमसनने आतापर्यंत 5 इनिंगमध्ये 171 रन केले आहेत, यातल्या 159 रन पहिल्या 3 मॅचमध्येच आल्या होत्या. सॅमसनच्या खराब कामगिरीमुळे राजस्थानच्या अडचणी वाढल्या आहेत. 3 मॅचमध्ये लागोपाठ पराभव झाल्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये ते 7व्या क्रमांकावर आहेत.

Published by: Shreyas
First published: October 7, 2020, 7:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या