स्पोर्ट्स

  • associate partner

IPL 2020 : फक्त 10 रन करूनही सूर्यकुमार यादव असा ठरला मुंबईच्या विजयाचा हिरो

IPL 2020 : फक्त 10 रन करूनही सूर्यकुमार यादव असा ठरला मुंबईच्या विजयाचा हिरो

आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात मुंबई (Mumbai Indians)ने पंजाब (Kings XI Punjab)वर 48 रननी दणदणीत विजय मिळवला.

  • Share this:

अबु धाबी, 2 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात मुंबई (Mumbai Indians)ने पंजाब (Kings XI Punjab)वर 48 रननी दणदणीत विजय मिळवला. रोहित शर्मा (Rohit Sharma)चं अर्धशतक आणि कायरन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या यांनी शेवटच्या काही ओव्हरमध्ये केलेल्या तुफानी फटकेबाजीमुळे मुंबईला 191 रनपर्यंत मजल मारता आली.

पंजाबने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईची सुरुवात अत्यंत खराब झाली. क्विंटन डिकॉक शून्य रनवर आऊट झाला, तर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या सूर्यकुमार यादव 7 बॉलमध्ये 10 रन करून माघारी परतला. या मॅचमध्ये सूर्यकुमार यादवला मोठी धावसंख्या उभारता आली नसली, तरी त्याने मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

मुंबईची बॅटिंग सुरु असताना दुसऱ्या ओव्हरमध्ये मोहम्मद शमीच्या शेवटच्या बॉलवर रोहित शर्माला एलबीडब्ल्यू आऊट देण्यात आलं. अंपायर एस. रवी यांनी आऊट दिल्यानंतर रोहित शर्मा डीआरएस घ्यायचा का नाही? याबाबत संभ्रमात होता, पण सूर्यकुमार यादवने रोहितला डीआरएस घ्यायला लावला. डीआरएसमध्ये रोहित शर्मा आऊट नसल्याचं स्पष्ट झालं आणि मुंबईच्या टीमने सुटकेचा निश्वास टाकला.

रोहित शर्माला आऊट देण्यात आलं तेव्हा तो 8 रनवर खेळत होता. यानंतर त्याने 45 बॉलमध्ये एकूण 70 रन केले. रोहित शर्मा आऊट झाल्यानंतरही मुंबईने आक्रमण सुरूच ठेवलं. मुंबईने शेवटच्या 6 ओव्हरमध्ये तब्बल 104 रन केले. पोलार्डने 20 बॉलमध्ये 47 रन आणि हार्दिक पांड्याने 11 बॉलमध्ये 30 रनची आतषबाजी केली. मुंबईने कृष्णप्पा गौतमने टाकलेल्या 20व्या ओव्हरमध्ये 4 सिक्स लगावले, यातले 3 पोलार्डने आणि 1 पांड्याने मारला.

पंजाबविरुद्धच्या या विजयासोबतच मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. मुंबईने आतापर्यंत 4 मॅचपैकी 2 मॅचमध्ये विजय मिळवला, तर 2 मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला.

Published by: Manoj Khandekar
First published: October 2, 2020, 4:26 PM IST

ताज्या बातम्या