Home /News /sport /

IPL 2020 : RCBच्या पराभवासाठी विराट जबाबदार? वाचा का टेकावे लागले मुंबईसमोर गुडघे

IPL 2020 : RCBच्या पराभवासाठी विराट जबाबदार? वाचा का टेकावे लागले मुंबईसमोर गुडघे

IPL 2020 च्या 48व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (Royal Challengers Bangalore) 5 गडी राखून दणदणीत पराभव केला.

    मुंबई, 29 ऑक्टोबर: IPL 2020 च्या 48व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (Royal Challengers Bangalore) 5 गडी राखून दणदणीत पराभव केला. बँगलोरने प्रथम फलंदाजी केली आणि  20 ओव्हर्समध्ये 164 धावा केल्या, तर मुंबई इंडियन्सने 19.1 ओव्हर्समध्येच ते लक्ष्य गाठलं. खरं तर या सामन्यात बँगलोरची सुरुवात मुंबईपेक्षा चांगलीच झाली होती, जोशुआ फिलिप्पी आणि देवदत्त पड्डीकल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली पण तरीही मुंबईने बंगळुरूवर सहज विजय मिळवला, याचे कारण काय, ते पुढे वाचा. विराट कोहलीची खराब फलंदाजी विराट कोहलीची खराब फलंदाजी ही आरसीबीच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण आहे. कोहली क्रीजवर आला तेव्हा बँगलोरची चांगली सुरुवात झाली होती. फिलिप्पी आणि पड्डीकल यांनी 47 चेंडूत 71 धावांची भागीदारी केली होती, पण विराट येताच रनरेट पूर्णपणे घसरला. विराट कोहली क्रीजवर अजिबात सेट होऊ शकला नाही आणि 14 चेंडूंत 9 धावांवर बाद झाला. बुमराहने विराट कोहलीची विकेट घेतली. ती बुमराहची 100वी विकेट होती. (हे वाचा-Ind vs Aus: भारताविरुद्ध वनडे आणि टी-20 सीरिजसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा) डिव्हिलियर्सचं चुकीच्या वेळी आउट होणं डिव्हिलियर्सच्या चुकीच्या चेंडूवर आणि चुकीची वेळी आउट होण्यानेही आरसीबीची हार पक्की केली. या सामन्यात डिव्हिलियर्स पूर्णपणे सेट दिसत होता, त्याने एक षटकार आणि एक चौकार मारला होता, परंतु त्यानंतर 16 व्या ओव्हरमध्ये पोलार्डच्या फुलटॉसवर डिव्हिलियर्सने राहुल चहरला कॅच दिला. डिव्हिलियर्स बाद झाल्यामुळे बँगलोरच्या जवळपास 20 धावा कमी झाल्या. बुमराहची जबरदस्त गोलंदाजी जसप्रीत बुमराहच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे बँगलोरवर विजय मिळवण्यास मदत झाली. बुमराहने 4 ओव्हर्समध्ये केवळ 14 धावा देऊन 3 गडी बाद केले. विराट कोहलीला बाद करण्यासोबतच या वेगवान गोलंदाजाने 17 व्या ओव्हरमध्ये शिवम दुबे आणि देवदत्त पड्डीकलला बाद करून बँगलोरचं कंबरडं मोडलं. पड्डीकल हा एक सेट फलंदाज होता आणि तो 74 धावांवर खेळत होता, परंतु बुमराहने त्याला बाद करून बंगळुरूला मोठ्या लक्ष्यपर्यंत जाऊ दिलं नाही. बुमराहने ही ओव्हर मेडन टाकली होती. (हे वाचा-धोनीच्या फॅनची क्रिकेटपटूकडून ट्विटरवरच शाळा, माहीवरील टीकेमुळे भडकला होता चाहता) सूर्यकुमारची धडाकेबाज फलंदाजी सूर्यकुमारची धडाकेबाज फलंदाजी बँगलोरच्या पराभवाचं सर्वात महत्त्वाचं कारण ठरली. या राइट हँड बॅट्समनने क्रीजवर येताच सहज शॉट्स खेळत बँगलोरच्या गोलंदाजांच्या कमकुवत बॉल्सना थेट बाँड्रीबाहेर धाडलं. अवघ्या 29 चेंडूंत अर्धशतक केलेल्या सूर्यकुमारने नाबाद 79 धावा केल्या, याचा परिणाम म्हणजे बंगळुरूचा पराभव झाला आणि मुंबईला या सीझनचा 8वा विजय मिळाला.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: IPL 2020, Mumbai Indians, RCB, Virat kohli

    पुढील बातम्या