Home /News /sport /

IPL 2020 : मैदानातच भिडले हार्दिक आणि मॉरिस, रेफरीने दिली समज

IPL 2020 : मैदानातच भिडले हार्दिक आणि मॉरिस, रेफरीने दिली समज

IPL 2020 मुंबईचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya)आणि क्रिस मॉरिस (Chris Morris)यांच्यात मैदानातच बाचाबाची झाली.

    अबु धाबी, 29 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)मध्ये बुधवारी झालेल्या मॅचमध्ये मुंबई (Mumbai Indians)ने बँगलोर (RCB)चा 5 विकेटने पराभव केला. याचसोबत मुंबईने प्ले-ऑफमध्येही त्यांचं स्थान जवळपास निश्चित केलं आहे. मॅचच्या शेवटच्या काही वेळात मुंबईचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya)आणि क्रिस मॉरिस (Chris Morris)यांच्यात मैदानातच बाचाबाची झाली. यानंतर मॅच रेफरी मनु नायर यांनी दोघांना समज दिली. या दोघांवर कोड ऑफ कंडक्ट तोडण्याचा आरोप लावण्यात आला. काय झालं मैदानात? मुंबईची बॅटिंग सुरू असताना 15व्या ओव्हरमध्ये मॉरिसने टाकलेले स्लो बॉल आणि यॉर्कर खेळताना हार्दिकला अडचणी येत होत्या, पण चौथ्या बॉलला पांड्याने सिक्स लगावली. 17व्या ओव्हरमध्ये हार्दिक आणि मॉरिस पुन्हा एकमेकांसमोर आले, पण यावेळा बाजी मॉरिसने मारली. पहिल्या पाचही बॉलवर मॉरिसने हार्दिकला एकही फोर मारण्याची संधी दिली नाही. यानंतर 19व्या ओव्हरमध्ये पांड्याने चौथ्या बॉवर सिक्स मारली, पण पुढच्याच बॉलवर मॉरिसने पांड्याची विकेट घेतली. मोहम्मद सिराजने हार्दिकचा कॅच पकडला. यानंतर हार्दिक पॅव्हेलियनमध्ये जात असताना मॉरिससोबत भांडायला लागला, या दोघांमध्ये शाब्दिक जुगलबंदी झाल्याचं पाहायला मिळालं. मॅच संपल्यानंतर मॅच रेफरीने या दोघांनाही समज दिली आहे. क्रिस मॉरिस आयपीएल कोड ऑफ कंटक्ट 2.5 ला तोडल्याचा दोषी, तर हार्दिक 2.20 नियम तोडण्याचा दोषी आढळला.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या