मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : हार्दिक पांड्याची तुफान फटकेबाजी, राजस्थानला मोठं आव्हान

IPL 2020 : हार्दिक पांड्याची तुफान फटकेबाजी, राजस्थानला मोठं आव्हान

हार्दिक पांड्या (Hardik Pandya)ने केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे मुंबई (Mumbai Indians)ने राजस्थान (Rajasthan Royals)ला विजयासाठी 196 रनचं आव्हान ठेवलं आहे.

हार्दिक पांड्या (Hardik Pandya)ने केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे मुंबई (Mumbai Indians)ने राजस्थान (Rajasthan Royals)ला विजयासाठी 196 रनचं आव्हान ठेवलं आहे.

हार्दिक पांड्या (Hardik Pandya)ने केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे मुंबई (Mumbai Indians)ने राजस्थान (Rajasthan Royals)ला विजयासाठी 196 रनचं आव्हान ठेवलं आहे.

  • Published by:  Shreyas
अबु धाबी, 25 ऑक्टोबर : हार्दिक पांड्या (Hardik Pandya)ने केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे मुंबई (Mumbai Indians)ने राजस्थान (Rajasthan Royals)ला विजयासाठी 196 रनचं आव्हान ठेवलं आहे. हार्दिक पांड्याने 21 बॉलमध्ये 60 रनची खेळी केली, यामध्ये 7 सिक्स आणि 2 फोरचा समावेश होता. मुंबईने कार्तिक त्यागीने टाकलेल्या 20व्या ओव्हरमध्ये तब्बल 27 रन केले, यामध्ये हार्दिकने 3 सिक्स आणि 2 फोर मारले. या मॅचमध्ये मुंबईचा कर्णधार कायरन पोलार्डने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला होता, पण मुंबईची सुरुवात खराब झाली. फॉर्ममध्ये असलेला क्विंटन डिकॉक 6 रनवर माघारी परतला. यानंतर इशान किशन आणि सूर्यकुमार यादवने मुंबईच्या इनिंगला आकार द्यायला सुरुवात केली. सूर्यकुमार यादवने 40 तर इशान किशनने 37 रन केले. सौरभ तिवारीनेही 25 बॉलमध्ये 34 रन करुन मोलाची साथ दिली. राजस्थानकडून जोफ्रा आर्चर आणि श्रेयस गोपाळ यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर कार्तिक त्यागीला 1 विकेट घेण्यात यश आलं. आयपीएल (IPL 2020)च्या रविवारच्या दुसऱ्या मॅचमध्ये मुंबई (Mumbai Indians)ची टीम पुन्हा एकदा रोहित शर्माशिवाय मैदानात उतरली आहे. राजस्थान (Rajasthan Royals)विरुद्धच्या या मॅचमध्ये मुंबईचा कर्णधार कायरन पोलार्डने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचमध्ये मुंबईने टीममध्ये एक बदल केला आहे. नॅथन कुल्टर नाईलच्या ऐवजी जेम्स पॅटिनसन याचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे, तर राजस्थानने त्यांच्या टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही. राजस्थानच्या टीमला प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी उरलेल्या सगळ्या मॅच जिंकाव्याच लागणार आहेत. या सगळ्या मॅचमध्ये विजय मिळवला, तरी त्यांना प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी इतर टीमच्या कामगिरीवरही अवलंबून राहावं लागणार आहे. त्यामुळे त्यांचा प्ले-ऑफला पोहोचण्याचा मार्ग सध्या तरी खडतर दिसत आहे. पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थानची टीम सध्या शेवटच्या म्हणजेच 8 व्या क्रमांकावर आहे. राजस्थानने 11 पैकी 4 मॅच जिंकल्या असून 7 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. दुसरीकडे मुंबईची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबईने त्यांच्या 10 मॅचपैकी 7 मॅच जिंकल्या असून फक्त 3 मॅचमध्येच त्यांचा पराभव झाला आहे. मुंबईची टीम क्विंटन डिकॉक, इशान किशन, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, जेम्स पॅटिनसन, राहुल चहर, ट्रेन्ट बोल्ट, जसप्रीत बुमराह राजस्थानची टीम रॉबिन उथप्पा, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, जॉस बटलर, स्टीव्ह स्मिथ, रियान पराग, राहुल तेवतिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाळ, अंकित राजपूत, कार्तिक त्यागी
First published:

पुढील बातम्या