मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : हा तर भारताचा एबी, हरभजनकडून मुंबईच्या खेळाडूचं कौतूक

IPL 2020 : हा तर भारताचा एबी, हरभजनकडून मुंबईच्या खेळाडूचं कौतूक

आयपीएल (IPL 2020) च्या या मोसमातही मुंबई (Mumbai Indians)ने चॅम्पियनशीपला गवसणी घातली. यानंतर मुंबईच्या टीमवर आणि खेळाडूंवर चहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताचा दिग्गज खेळाडू हरभजन सिंग (Harbhajan Singh) यानेही मुंबईच्या कामगिरीची प्रशंसा केली.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 13 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) च्या या मोसमातही मुंबई (Mumbai Indians)ने चॅम्पियनशीपला गवसणी घातली. यानंतर मुंबईच्या टीमवर आणि खेळाडूंवर चहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताचा दिग्गज खेळाडू हरभजन सिंग (Harbhajan Singh) यानेही मुंबईच्या कामगिरीची प्रशंसा केली. मुंबईच्या सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)ला हरभजनने भारताचा एबी डिव्हिलियर्सची उपमा दिली. सूर्यकुमार यादव एकहाती मॅच जिंकवू शकतो, असं हरभजन म्हणाला. सूर्याने या आयपीएलच्या मोसमात 16 मॅचमध्ये 40 ची सरासरी आणि 145.01 च्या स्ट्राईक रेटने 480 रन केले.

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना हरभजन म्हणाला, 'सूर्यकुमार यादवने स्वत:च्या खेळात बदल केले आणि तो मॅच जिंकवून देणारा खेळाडू बनला आहे. मुंबईच्या बॅटिंगची त्याने बरीच जबाबदारी घेतली आहे. पहिल्या बॉलपासूनच तो शॉट मारायला सुरुवात करतो. एबी डिव्हिलियर्स प्रमाणे तो मैदानाच्या कोणत्याही बाजूला शॉट मारू शकतो.'

'सूर्यकुमारला थांबवणं कठीण आहे, कारण त्याच्याकडे सगळे शॉट आहेत. तो कव्हरच्या वरून खेळतो, स्वीपही चांगली मारतो, स्पिनरलाही उत्तम खेळतो आणि फास्ट बॉलिंगही चांगली खेळतो. तो भारताचा एबी डिव्हिलियर्स आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची भारतीय टीममध्ये निवड व्हायची गरज होती. यावेळी निवड झाली नसली, तरी तो आता फार लांब नाही,' असा विश्वास हरभजनने व्यक्त केला.

आयपीएल फायनलमध्ये मुंबईने दिल्लीचा पराभव करत ट्रॉफी स्वत:कडेच ठेवली. आयपीएल इतिहासातली मुंबई ही सगळ्यात यशस्वी टीम आहे. 13 आयपीएलमध्ये मुंबईने 5 वेळा ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.

First published: