IPL 2020 : प्रतीक्षा संपली! क्रिस गेल या दिवशी पुन्हा मैदानात उतरणार

IPL 2020 : प्रतीक्षा संपली! क्रिस गेल या दिवशी पुन्हा मैदानात उतरणार

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात संघर्ष करणाऱ्या पंजाब (Kings XI Punjab)साठी दिलासादायक बातमी आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणारा युनिव्हर्स बॉस क्रिस गेल (Chris Gayle) च्या पुनरागमनाचा मुहूर्त ठरला आहे.

  • Share this:

दुबई, 14 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात संघर्ष करणाऱ्या पंजाब (Kings XI Punjab)साठी दिलासादायक बातमी आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणारा युनिव्हर्स बॉस क्रिस गेल (Chris Gayle) पूर्णपणे फिट झाला आहे. एवढच नाही, तर तो गुरुवारी बँगलोर (Royal Challengers Bangalore)विरुद्धच्या मॅचमधून पुनरागमन करणार आहे. यंदाच्या मोसमात गेलने एकही सामना खेळला नव्हता. काहीच दिवसांपूर्वी पोटाच्या दुखापतीमुळे गेलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

पंजाबच्या टीमने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन गेलचा एक व्हिडिओ शेयर केला आहे. 'चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली. युनिव्हर्स बॉस परत आला आहे. तुम्ही सगळे त्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होतात', असं गेल या व्हिडिओमध्ये म्हणाला आहे.

खरंतर क्रिस गेल हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्येच खेळणार होता, पण पोटदुखीमुळे तो मैदानात उतरु शकला नाही, असं टीमचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी सांगितलं होतं. गेलच्या आगमनामुळे पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर असलेली पंजाबची टीम आता करिश्म्याची अपेक्षा करत असेल.

पंजाबच्या टीमने 7 मॅचपैकी फक्त 1 सामना जिंकला आहे. आता पंजाबच्या टीमचा एकही पराभव झाला, तर प्ले-ऑफमध्ये जायचं त्यांचं स्वप्न भंगेल. गेलला मात्र पंजाब उरलेल्या सगळ्या मॅच जिंकेल, असा विश्वास वाटत आहे.

'अजूनही प्ले-ऑफमध्ये जाणं शक्य आहे. आम्ही शेवटच्या क्रमांकावर असलो, तरीदेखील प्ले-ऑफमध्ये पोहोचू शकतो. आमचे 7 सामने राहिले आहेत. या सगळ्या मॅच आम्ही जिंकू शकतो. स्वत:वर विश्वास ठेवा, आता आपण यापेक्षा खाली जाऊ शकत नाही, उलट वरतीच जाऊ,' असं गेल म्हणाला आहे.

पंजाबच्या टीममध्ये गेलचं पुनरागमन झालं तर ग्लेन मॅक्सवेलला डच्चू मिळू शकतो. मॅक्सवेलने 7 मॅचमध्ये फक्त 58 रन केले आहेत.

Published by: Shreyas
First published: October 14, 2020, 5:20 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading