10 कोटींच्या चियरलीडरच्या वक्तव्यावरुन मॅक्सवेलचं सेहवागला प्रत्युत्तर

10 कोटींच्या चियरलीडरच्या वक्तव्यावरुन मॅक्सवेलचं सेहवागला प्रत्युत्तर

आयपीएल (IPL 2020) च्या या मोसमात खराब कामगिरी करणाऱ्या पंजाब (KXIP) च्या ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) वर वीरेंद्र सेहवागने निशाणा साधला होता. आता मॅक्सवेलने सेहवाग (Virender Sehwag) ला प्रत्युत्तर दिलं आहे.

  • Share this:

मुंबई : आयपीएल (IPL 2020) च्या या मोसमात खराब कामगिरी करणाऱ्या पंजाब (KXIP) च्या ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) वर वीरेंद्र सेहवागने निशाणा साधला होता. सेहवाग मॅक्सवेलला 10 कोटी रुपयांचा चियरलीडर म्हणाला होता. आता मॅक्सवेलने सेहवाग (Virender Sehwag) ला प्रत्युत्तर दिलं आहे. सेहवाग चर्चेत राहण्यासाठी अशी वक्तव्य करतो, तसंच त्याला मी आवडत नाही, असं मॅक्सवेल म्हणाला.

'सेहवागचं वक्तव्य ऐकून मी अजिबात हैराण झालो नाही. पंजाबचा मेंटर असतानाही सेहवाग अशाप्रकारचं बोलला होता. त्याला मी आवडत नाही. तो माझ्याबद्दल जास्त बोलतो. त्याला जे आवडतं ते तो बोलू शकतो. अशा वक्तव्यांमुळे तो मीडियात चर्चेत राहतो. मी अशा गोष्टींकडे लक्ष न देता पुढे निघून जातो,' अशी प्रतिक्रिया मॅक्सवेलने दिली.

आयपीएल संपल्यानंतर फेसबूकवरच्या व्हिडिओमध्ये सेहवाग मॅक्सवेलला कामचोर आणि 10 कोटी रुपयांचा चियरलीडर म्हणाला होता. '10 कोटी रुपयांचा हा चियरलीडर पंजाबला महागात पडला. मागच्या काही वर्षातलं मॅक्सवेलचं रेकॉर्ड कामचोरीचं आहे. या मोसमात तर त्याने हे रेकॉर्डही मोडलं,' असं वक्तव्य सेहवागने केलं होतं.

ग्लेन मॅक्सवेलने आयपीएलच्या या मोसमात खराब कामगिरी केली होती. 13 मॅचमध्ये त्याने 15.42 च्या सरासरीने त्याने 108 रन केले होते. या संपूर्ण मोसमात मॅक्सवेलला एकही सिक्स लगावता आला नाही. आता भारताविरुद्धच्या सीरिजसाठी आपण तयार असल्याचं मॅक्सवेल म्हणाला आहे.

Published by: Shreyas
First published: November 20, 2020, 7:14 PM IST
Tags:

ताज्या बातम्या