IPL 2020 : मॅक्सवेलच्या मानसिक संतुलनावर बोलणाऱ्याला होणाऱ्या पत्नीने सुनावलं

IPL 2020 : मॅक्सवेलच्या मानसिक संतुलनावर बोलणाऱ्याला होणाऱ्या पत्नीने सुनावलं

IPL 2020 ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell)ला मानसिक संतुलनावरुन ट्रोल करणाऱ्याला त्याच्या होणाऱ्या पत्नीने जशास तसं उत्तर दिलं आहे.

  • Share this:

अबु धाबी, 2 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात पंजाब (Kings XI Punjab)ची कामगिरी आतापर्यंत निराशाजनक झाली आहे. याचं एक कारण त्यांचा प्रमुख खेळाडू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell)चं फॉर्ममध्ये नसणं हेदेखील आहे. यंदाच्या स्पर्धेत झालेल्या 4 मॅचमध्ये मॅक्सवेलची बॅट चालली नाही. त्याला 10 च्या सरासरीने फक्त 30 रन करता आल्या आहेत. या सुमार कामगिरीनंतर मॅक्सवेलवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

सोशल मीडियावरही मॅक्सवेलला ट्रोल करण्यात येत आहे. इन्स्टाग्रामवर एकाने त्याच्या मानसिक संतुलनावर प्रश्न उपस्थित केले, यानंतर मॅक्सवेलच्या होणाऱ्या बायकोने या व्यक्तीला सडेतोड प्रत्युत्तर दिलं.

'मानसिक संतुलन ठिकाणावर नसलेल्या व्यक्तीला सोडून दे आणि एखाद्या भारतीय व्यक्तीशी लग्न कर,' अशी कमेंट एकाने मॅक्सवेलची होणारी बायको विन्नी रमणच्या इन्स्टाग्राम पोस्टवर केली, यावर विन्नीनेही जशास तसं प्रत्युत्तर दिलं.

'कोणत्याही व्यक्तीवर त्याचं राष्ट्रीयत्व आणि त्याचा रंग पाहून प्रेम केलं जात नाही. मी माझ्या आयुष्याचे निर्णय एखाद्या मुर्ख आणि अनोळखी माणसाच्या बोलण्यावरुन घेत नाही. तुला जर हे बघायची इच्छा नसेल, तर पुढे जा,' असं विन्नी रमण म्हणाली.

होणाऱ्या बायकोने दिलेलं हे उत्तर मॅक्सवेललाही आवडलं, त्यामुळे त्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्येही याचा स्क्रीनशॉट शेयर केला आहे. वर्ल्ड कपनंतर ग्लेन मॅक्सवेल डिप्रेशनमध्ये गेला होता, त्यामुळे काही काळासाठी त्याने क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. या काळात मॅक्सवेलचं पूर्ण लक्ष विन्नी रमणकडेच होतं. यंदाच्या आयपीएलमध्ये मॅक्सवेलची बॅट अजून तरी शांतच आहे.

Published by: Shreyas
First published: October 2, 2020, 7:11 PM IST
Tags:

ताज्या बातम्या