मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2020 : कार्तिकने कर्णधारपद सोडलं; KKRला दोनदा जिंकवणाऱ्या गंभीरचा निशाणा कोणावर?

IPL 2020 : कार्तिकने कर्णधारपद सोडलं; KKRला दोनदा जिंकवणाऱ्या गंभीरचा निशाणा कोणावर?

आयपीएल (IPL 2020) अर्ध्यावर आली असतानाच कोलकाता (KKR)चा कर्णधार दिनेश कार्तिक (Dinesh Karthik)याने नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला. मुंबई (Mumbai Indians)विरुद्धच्या मॅचच्या काही तास आधीच कार्तिकने याबाबतची घोषणा केली.

आयपीएल (IPL 2020) अर्ध्यावर आली असतानाच कोलकाता (KKR)चा कर्णधार दिनेश कार्तिक (Dinesh Karthik)याने नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला. मुंबई (Mumbai Indians)विरुद्धच्या मॅचच्या काही तास आधीच कार्तिकने याबाबतची घोषणा केली.

आयपीएल (IPL 2020) अर्ध्यावर आली असतानाच कोलकाता (KKR)चा कर्णधार दिनेश कार्तिक (Dinesh Karthik)याने नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला. मुंबई (Mumbai Indians)विरुद्धच्या मॅचच्या काही तास आधीच कार्तिकने याबाबतची घोषणा केली.

अबु धाबी, 16 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) अर्ध्यावर आली असतानाच कोलकाता (KKR)चा कर्णधार दिनेश कार्तिक (Dinesh Karthik)याने नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला. मुंबई (Mumbai Indians)विरुद्धच्या मॅचच्या काही तास आधीच कार्तिकने याबाबतची घोषणा केली. कार्तिकने कर्णधारपद सोडल्यानंतर कोलकात्याने इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या इयन मॉर्गन (Eoin Morgan)ला नेतृत्वाची जबाबदारी दिली. बॅटिंगवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी आपण कर्णधारपद सोडत असल्याचं कार्तिकने सांगितलं. 2018 साली कार्तिक कोलकात्याच्या टीममध्ये आला. कार्तिकने कर्णधारपद सोडल्यानंतर टीमचा माजी कर्णधार गौतम गंभीरने एक ट्विट केलं आहे.

या ट्विटमध्ये गंभीरने कोणाचंही नाव घेतलं नसलं, तरी त्याने केकेआरच्या प्रशासनावर निशाणा साधल्याचं बोललं जात आहे. 'वारसा तयार करायला अनेक वर्ष लागतात, पण त्याला उद्धवस्त करायला एक मिनिटही पुरतं,' असं ट्विट गंभीरने केलं आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वात कोलकात्याने दोन वेळा आयपीएल जिंकली आहे.

गौतम गंभीरशिवाय आकाश चोप्रा आणि इरफान पठाण यांनीही या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. 'आज रात्री मॅच असताना कोलकात्याने हा निर्णय घेतला. इयन मॉर्गन आयपीएल 2020 मध्ये एवढा फॉर्ममध्ये नाही. स्पर्धेतल्या आणखी एका टीमचा विदेशी कर्णधार फॉर्म परत मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे,' असं आकाश चोप्रा म्हणाला.

तर इरफान पठाणनेही स्पर्धा सुरु असतानाच कर्णधार बदलणं खेळाडूंसाठी कठीण असतं. केकेआर रस्ता भटकणार नाही, अशी अपेक्षा करुया, असं ट्विट इरफानने केलं. तसंच केकेआरचा प्रशिक्षक ब्रॅण्डन मॅक्क्लम परदेशी असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. एखादा भारतीय प्रशिक्षक असता, तर असा निर्णय झाला नसता, असंही पठाण म्हणाला. स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात पठाण बोलत होता.

दुसरीकडे केकेआरचे सीईओ वैंकी मैसूर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'दिनेश कार्तिकचं नेतृत्व मिळवणारे आम्ही नशीबवान होतो. त्याने नेहमीच टीमला महत्त्व दिलं. हा निर्णय घेताना त्याने साहस दाखवलं. आम्ही त्याच्या निर्णायचा सन्मान करतो, तसंच या निर्णयामुळे आम्हीही हैराण झालो. कार्तिक आणि मॉर्गन यांनी मिळून चांगलं काम केलं. मॉगर्नने जरी आता कर्णधारपद स्वीकारलं असलं, तरी ही भूमिकांची अदलाबदली आहे. या गोष्टी अगदी सहजतेनं होतील, अशी आमची अपेक्षा आहे. अडीच वर्ष कार्तिकने दिलेल्या योगदानाबद्दल त्याचे आभार आणि मॉगर्नला शुभेच्छा', असं मैसूर म्हणाले.

कोलकात्याचं नेतृत्व करताना मॉर्गनला पहिल्याच मॅचमध्ये अपयश आलं. मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये कोलकात्याचा 8 विकेटने पराभव झाला. पॉईंट्स टेबलमध्ये केकेआर चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांनी 8 पैकी 4 मॅच जिंकल्या आहेत, तर 4 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.

First published:
top videos