मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2020 : धोनीच्या व्हिडिओवर भज्जी हसला, फॅन्स म्हणाले, 'तू आफ्रिदीचा मित्र, धोकेबाज'

IPL 2020 : धोनीच्या व्हिडिओवर भज्जी हसला, फॅन्स म्हणाले, 'तू आफ्रिदीचा मित्र, धोकेबाज'

आयपीएल (IPL 2020)मधून माघार घेतलेला हरभजन सिंग (Harbhajan Singh)धोनीच्या चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे.

आयपीएल (IPL 2020)मधून माघार घेतलेला हरभजन सिंग (Harbhajan Singh)धोनीच्या चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे.

आयपीएल (IPL 2020)मधून माघार घेतलेला हरभजन सिंग (Harbhajan Singh)धोनीच्या चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे.

मुंबई, 16 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)मधून माघार घेतलेला हरभजन सिंग (Harbhajan Singh)धोनीच्या चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. हरभजन सिंगने धोनीच्या एका व्हिडिओवर हसण्याची इमोजी पोस्ट केली, यानंतर चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि धोनीचे चाहते भज्जीवर चांगलेच नाराज झाले.

हरभजन सिंगने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन एमएस धोनी आणि अंपायर यांच्यात वाईड वरुन झालेल्या वादाचा व्हिडिओ शेयर केला. हा व्हिडिओ शेयर करताना हरभजनने हसण्याचा इमोजी पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये धोनीच्या नाराजीनंतर अंपायर पॉल रायफल यांनी त्यांचा वाईडचा निर्णय मागे घेतला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हरभजन सिंग यानेही या व्हिडिओवर हसून प्रतिक्रिया दिली.

हरभजनच्या या प्रतिक्रियेवर चेन्नई आणि धोनीचे चाहते संतप्त झाले. हरभजन हा शाहिद आफ्रिदीचा मित्र आहे, तसंच तो धोकेबाज आहे, अशा प्रतिक्रिया हरभजनच्या या पोस्टवर येत आहेत.

हरभजन सिंग कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊन दरम्यान वादात सापडला होता. हरभजन आणि युवराजने शाहिद आफ्रिदीच्या फाऊंडेशनला मदत करण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर एका कार्यक्रमात आफ्रिदीने पंतप्रधान मोदींविरोधात वादग्रस्त वक्तव्य केली होती. यानंतरही हरभजन आणि युवराजवर टीका झाली होती. अखेर वादानंतर हरभजननने आफ्रिदीवर टीका केली होती. आता हरभजन पुन्हा एकदा वादात सापडला आहे.

First published: