Home /News /sport /

IPL 2020 : 'चल आणखी मुलांना जन्म देऊ', खेळाडूच्या पत्नीची थेट सोशल मीडियावर पोस्ट

IPL 2020 : 'चल आणखी मुलांना जन्म देऊ', खेळाडूच्या पत्नीची थेट सोशल मीडियावर पोस्ट

आयपीएल (IPL 2020) खेळण्यासाठी जगातले दिग्गज क्रिकेटपटू हे सध्या युएईमध्ये आहेत. बहुतेक क्रिकेटपटूंसोबत त्यांच्या पत्नीही प्रवास करत आहेत. पण चेन्नईचा क्रिकेटपटू फाफ डुप्लेसिस (Faf Du Plessis) याची पत्नी सध्या चर्चेत आली आहे.

    दुबई, 21 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) खेळण्यासाठी जगातले दिग्गज क्रिकेटपटू हे सध्या युएईमध्ये आहेत. बहुतेक क्रिकेटपटूंसोबत त्यांच्या पत्नीही प्रवास करत आहेत. पण चेन्नईचा क्रिकेटपटू फाफ डुप्लेसिस (Faf Du Plessis) याची पत्नी सध्या चर्चेत आली आहे. डुप्लेसिसची पत्नी इमारीने थेट इन्स्टाग्रामवर 'चल आणखी मुलांना जन्म देऊ,' अशी धक्कादायक पोस्ट केली. या पोस्टमध्येच पुढे तिने मी मस्करी करत असल्याचंही स्पष्ट केलं. पत्नीच्या या पोस्टवर फाफनेही मी तयार असल्याची प्रतिक्रिया दिली. फाफ डुप्लेसिस दोन मुलांचा बाप आहे. डुप्लेसिसची पत्नी इमारीने आयपीएलआधीच दुसऱ्यांदा आई बनली. फाफ आणि इमारी यांच्या घरी तान्ह्या मुलीचं आगमन झालं. फाफ आणि इमारी यांना एकूण दोन मुली आहेत. या दोघांनी 7 वर्ष आधी 2013 साली लग्न केलं होतं. Faf du Plessis' story इमारी दक्षिण आफ्रिकेतला राजकीय पक्ष असलेल्या डेमोक्रॅटिक अलायन्सच्या खासदार कॅरिन यांची मुलगी आहे. याचसोबत ती एका मोठ्या कंपनीमध्ये मार्केटिंग असिस्टंट आहे. याशिवाय इमारी सामाजिक संस्थेशीही जोडली गेली आहे. ही संस्था कॅन्सरविरुद्ध जनजागृती करण्याचं काम करते, तसंच बलात्कार पीडितांना आर्थिक मदतही करते. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात चेन्नईची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. 10 पैकी फक्त 3 मॅचमध्ये चेन्नईचा विजय झाला आहे, तर 7 मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईची टीम शेवटच्या क्रमांकावर आहे. फाफ डुप्लेसिसने मात्र यंदा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने या मोसमात 46.87 च्या सरासरीने 375 रन केले आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या