Home /News /sport /

IPL 2020 : कार्तिकने सोडलं कोलकात्याचं कर्णधारपद, आता मॉर्गनकडे टीमचं नेतृत्व

IPL 2020 : कार्तिकने सोडलं कोलकात्याचं कर्णधारपद, आता मॉर्गनकडे टीमचं नेतृत्व

दिनेश कार्तिक (Dinesh Karthik)याने कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders)चे कर्णधारपद सोडलं आहे. कार्तिकऐवजी इंग्लंडच्या वनडे टीमचा कर्णधार इयन मॉर्गन (Eoin Morgan) कडे आता कोलकात्याचं नेतृत्व असेल.

    दुबई, 16 ऑक्टोबर : दिनेश कार्तिक (Dinesh Karthik)याने कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders)चे कर्णधारपद सोडलं आहे. कार्तिकऐवजी इंग्लंडच्या वनडे टीमचा कर्णधार इयन मॉर्गन (Eoin Morgan) कडे आता कोलकात्याचं नेतृत्व असेल. मुंबईविरुद्धच्या आजच्या मॅचआधीच कार्तिकने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे मुंबईविरुद्ध आज केकेआर (KKR)मॉर्गनच्या नेतृत्वात मैदानात उतरेल. कार्तिकने कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर केकेआरचे सीईओ वैंकी मैसूर यांनी माहिती दिली. एवढा मोठा निर्णय घेण्यासाठी हिंमत गरजेची असते. आम्ही त्याच्या निर्णयामुळे हैराण झालो आहोत. पण आम्ही त्याच्या या निर्णयाचा सन्मान करतो. दिनेश कार्तिकने नेहमीच पहिले टीमचा विचार केला, असं वैंकी मैसूर म्हणाले. आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात दिनेश कार्तिकची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. मागच्या मॅचमध्ये तो फक्त 1 रन करुन आऊट झाला. यंदाच्या मोसमात 7 इनिंगमध्ये त्याने 108 रन केले आहेत, यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. बॅटिंगवर लक्ष केंद्रीत करण्यासाठीच कार्तिकने नेतृत्व सोडल्याचं बोललं जात आहे. या हंगामात कोलकात्याने 7 पैकी 4 मॅच जिंकल्या आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये कोलकाता 8 पॉईंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. इयन मॉर्गन हा सध्या इंग्लंडच्या वनडे टीमचा कर्णधार आहे. मागच्या वर्षी मॉर्गनच्याच नेतृत्वात इंग्लंडने पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकला होता. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या लिलावावेळी केकेआरने मॉर्गनला 5.25 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. यावर्षी आयपीएलमध्ये त्याने 7 इनिंगमध्ये 35 च्या सरसारीने 175 रन केले आहेत. मॉर्गनला यावेळी एकही अर्धशतक करता आलेलं नाही. 2017 साली गंभीर कर्णधारपदावरुन हटल्यानंतर दिनेश कार्तिकने नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली होती. 2018 च्या आयपीएलआधी केकेआरने कार्तिकला 7.4 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. 2018 साली केकेआरची टीम चौथ्या क्रमांकावर होती, तर मागच्यावर्षी त्यांना प्ले-ऑफला पोहोचता आलं नव्हतं.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या