Home /News /sport /

IPL 2020 : रसेलला शेवटची ओव्हर का दिली? मॉर्गनने सांगितलं कारण

IPL 2020 : रसेलला शेवटची ओव्हर का दिली? मॉर्गनने सांगितलं कारण

आयपीएल (IPL 2020)च्या रविवारी झालेल्या कोलकाता (KKR)आणि हैदराबाद (SRH)यांच्यातली मॅच टाय झाली. या सुपर ओव्हरमध्ये कोलकात्याचा विजय झाला. हैदराबादला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 18 रनची गरज होती. तेव्हा कोलकात्याचा कर्णधार इयन मॉर्गन (Eoin Morgan)याने आंद्रे रसेल (Andre Russell) ला बॉलिंग दिली.

पुढे वाचा ...
    अबु धाबी, 19 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या रविवारी झालेल्या कोलकाता (KKR)आणि हैदराबाद (SRH)यांच्यातली मॅच टाय झाली. या सुपर ओव्हरमध्ये कोलकात्याचा विजय झाला. हैदराबादला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 18 रनची गरज होती. तेव्हा कोलकात्याचा कर्णधार इयन मॉर्गन (Eoin Morgan)याने आंद्रे रसेल (Andre Russell) ला बॉलिंग दिली. रसेलने 20व्या ओव्हरमध्ये 17 रन दिल्यामुळे ही मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली. मॅचनंतर इयन मॉर्गनला रसेलला शेवटची ओव्हर का देण्यात आली? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उत्तर देताना त्यानेच बॉलिंग मागितल्याचं मॉर्गन म्हणाला. 'आंद्रे रसेल मॅचच्या दरम्यानच मैदानाबाहेर गेला होता. आम्हाला वाटलं त्याला दुखापत झाली, पण तो परत आला आणि मला बॉलिंग करायची आहे, असं म्हणाला. आम्हाला वाटलं की तो चांगली बॉलिंग टाकेल,' अशी प्रतिक्रिया मॉर्गनने दिली. कोलकात्याच्या या विजयामध्ये लॉकी फर्ग्युसन याने महत्त्वाची भूमिका बजावली. सुपर ओव्हरमध्ये फर्ग्युसनने 3 बॉलमध्येच हैदराबादच्या वॉर्नर आणि अब्दुल समद या दोन्ही बॅट्समनना पॅव्हेलियनमध्ये परत पाठवलं. यामुळे कोलकात्याला विजयासाठी फक्त 3 रनचं आव्हान मिळालं. सुपर ओव्हरमध्ये टीमच्या 2 विकेट गेल्या की त्यांची इनिंग तिकडेच संपते. IPL 2020 : पॅट कमिन्सपेक्षा 13.9 कोटी रुपयांनी स्वस्त बॉलर, पहिल्याच मॅचमध्ये KKRला जिंकवलं त्याआधी हैदराबादला दिलेलं 164 रनचं आव्हान रोखतानाही फर्ग्युसनने उत्कृष्ट बॉलिंग केली. फर्ग्युसनने त्याच्या 4 ओव्हरमध्ये फक्त 15 रन देऊन 3 विकेट घेतल्या. केन विलियमसन, प्रियम गर्ग आणि मनिष पांडे यांना फर्ग्युसनने आऊट केलं. या कामगिरीबद्दल फर्ग्युसनला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. हैदराबादविरुद्धच्या या विजयासोबतच कोलकात्याचे 10 पॉईंट्स झाले आहेत. केकेआरने या मोसमात 9 पैकी 5 मॅचमध्ये विजय मिळवला आहे, तर 4 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये केकेआर चौथ्या क्रमांकावर आहे. तर हैदराबाद 6 पॉईंट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे. हैदराबादने 9 पैकी 3 मॅच जिंकल्या असून 6 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या