मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : विराटचं स्वप्न पुन्हा भंगलं, एलिमिनेटरमध्ये हैदराबादचा बँगलोरवर विजय

IPL 2020 : विराटचं स्वप्न पुन्हा भंगलं, एलिमिनेटरमध्ये हैदराबादचा बँगलोरवर विजय

आयपीएल (IPL 2020) जिंकण्याचं विराट कोहली (Virat Kohli)चं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे. एलिमिनेटरच्या सामन्यामध्ये हैदराबाद (SRH) ने बँगलोर (RCB) चा पराभव केला आहे.

आयपीएल (IPL 2020) जिंकण्याचं विराट कोहली (Virat Kohli)चं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे. एलिमिनेटरच्या सामन्यामध्ये हैदराबाद (SRH) ने बँगलोर (RCB) चा पराभव केला आहे.

आयपीएल (IPL 2020) जिंकण्याचं विराट कोहली (Virat Kohli)चं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे. एलिमिनेटरच्या सामन्यामध्ये हैदराबाद (SRH) ने बँगलोर (RCB) चा पराभव केला आहे.

  • Published by:  Shreyas

अबु धाबी, 6 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) जिंकण्याचं विराट कोहली (Virat Kohli)चं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे. एलिमिनेटरच्या सामन्यामध्ये हैदराबाद (SRH) ने बँगलोर (RCB) चा पराभव केला आहे, त्यामुळे बँगलोरचं यंदाच्या आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात आलं आहे. बँगलोरने ठेवलेल्या 132 रनच्या छोट्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात खराब झाली. पण केन विलियमसन आणि जेसन होल्डर यांनी हैदराबादचा डाव सावरत विजयाला गवसणी घातली. केन विलियमसनने 44 बॉलमध्ये नाबाद 50 रन, तर जेसन होल्डरने 20 बॉलमध्ये नाबाद 24 रनची खेळी केली. शेवटच्या ओव्हरमध्ये हैदराबादला विजयासाठी 9 रनची गरज होती. नवदीप सैनीच्या पहिल्या बॉलवर एक रन काढून केन विलियमसनने अर्धशतक पूर्ण केलं आणि होल्डरला स्ट्राईक दिला. दुसऱ्या बॉलवर होल्डरला एकही रन काढता आली नाही, मात्र पुढच्या दोन्ही बॉलवर फोर मारून होल्डरने मॅच संपवली.

बँगलोरने दिलेलं लक्ष्य गाठण्यासाठी आलेल्या हैदराबादची सुरुवात खराब झाली. या मोसमातली पहिलीच मॅच खेळणारा श्रीवस्त गोस्वामी शून्य रनवर आऊट झाला. तर फॉर्ममध्ये असलेला डेव्हिड वॉर्नर 17 रनवर माघारी परतला. यानंतर केन विलियमसन आणि मनिष पांडे यांच्यात पार्टनरशीप झाली, पण मनिष पांडेही 24 रनवर आऊट झाला, तर प्रियम गर्गला फक्त 7 रन करता आले. यानंतर मात्र विलियमसन आणि होल्डरने एकही विकेट पडून दिली नाही.

या मॅचमध्ये हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि बँगलोरला 20 ओव्हरमध्ये 131 रनमध्ये रोखलं. जेसन होल्डरने सुरुवातीलाच विराट कोहलीच्या रुपात बँगलोरला मोठा धक्का दिला. तर या मोसमात फॉर्ममध्ये असलेला देवदत्त पडिक्कल एक रन करून माघारी परतला. यानंतर एबी डिव्हिलियर्स आणि एरॉन फिंच यांनी बँगलोरची इनिंग सावरायला सुरुवात केली. एबीने 43 बॉलमध्ये 56 रन तर फिंचने 30 बॉलमध्ये 32 रन केले. याशिवाय बँगलोरच्या कोणत्याच खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. हैदराबादकडून जेसन होल्डरने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर नटराजनला 2 आणि शाहबाज नदीमला 1 विकेट मिळाली.

हैदराबादचा सामना दिल्लीशी

बँगलोरविरुद्ध विजय मिळवल्यानंतर आता हैदराबादचा सामना दिल्लीशी होणार आहे. रविवारी या दोन्ही टीममध्ये क्वालिफायरची दुसरी मॅच होईल. या मॅचमध्ये ज्या टीमचा विजय होईल, ती मंगळवारी मुंबईविरुद्ध आयपीएलची फायनल खेळेल,

First published: