IPL 2020 : KKR च्या पडझडीनंतर कार्तिकचा धमाका, पंजाबला 165 रनचं आव्हान

IPL 2020 : KKR च्या पडझडीनंतर कार्तिकचा धमाका, पंजाबला 165 रनचं आव्हान

पंजाब (KXIP) विरुद्धच्या मॅचमध्ये कोलकाता (KKR) टीमच्या सुरुवातीच्या पडझडीनंतर दिनेश कार्तिकने धमाकेदार खेळी केली आहे. कार्तिकने 29 बॉलमध्ये केलेल्या 58 रनमुळे कोलकात्याने पंजाबला विजयासाठी 165 रनचं आव्हान दिलं आहे.

  • Share this:

अबु धाबी, 10 ऑक्टोबर : पंजाब (KXIP) विरुद्धच्या मॅचमध्ये कोलकाता (KKR) टीमच्या सुरुवातीच्या पडझडीनंतर दिनेश कार्तिकने धमाकेदार खेळी केली आहे. कार्तिकने 29 बॉलमध्ये केलेल्या 58 रनमुळे कोलकात्याने पंजाबला विजयासाठी 165 रनचं आव्हान दिलं आहे. या मॅचमध्ये कोलकात्याचा कर्णधार दिनेश कार्तिकने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पण पंजाबच्या बॉलरनी कार्तिकचा हा निर्णय अयोग्य ठरवत अचूक मारा केला. 14 रनवरच कोलकात्याचे दोन बॅट्समन माघारी परतले होते. पण शुभमन गिल याने एका बाजूने किल्ला लढवला. गिलने 47 बॉलमध्ये 57 रन केले. तर इयन मॉर्गन 24 रन करून आऊट झाला. पंजाबकडून मोहम्मद शमी, रवी बिष्णोई आणि अर्शदीप सिंग यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली. कोलकात्याने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 164 रन केले.

यंदाच्या आयपीएल (IPL 2020) मधला सलग पाचवा पराभव टाळण्यासाठी पंजाब (KXIP) ची टीम मैदानात उतरत आहे. कोलकात्याने या मॅचमध्ये शिवम मावीऐवजी प्रसिद्ध कृष्णाला संधी दिली आहे. शिवम मावी दुखापतीमुळे हा सामना खेळू शकत नसल्याचं केकेआरचा कर्णधार कार्तिकने सांगितलं, तर दुसरीकडे पंजाबचा फास्ट बॉलर शेल्डन कॉट्रेललाही दुखापत झाल्यामुळे त्याच्याऐवजी क्रिस जॉर्डनला टीममध्ये घेण्यात आलं आहे.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात पंजाबची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. पंजाबला 6 पैकी 1 मॅचमध्येच पंजाबला विजय मिळाला, तर 5 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. आयपीएलमधलं प्ले ऑफचं आव्हान कायम ठेवण्यासाठी आता त्यांना चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. पॉईंट्स टेबलमध्ये पंजाबची टीम शेवटच्या क्रमांकावर आहे. तर कोलकात्याने 5 पैकी 3 सामने जिंकले असून 2 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. पॉईंट्स टेबलमध्ये केकेआर चौथ्या क्रमांकावर आहे.

पंजाबची टीम

केएल राहुल, मयंक अगरवाल, मनदीप सिंग, निकोलास पूरन, सिमरन सिंग, ग्लेन मॅक्सवेल, मुजीब उर रहमान, क्रिस जॉर्डन, रवी बिष्णोई, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग

कोलकात्याची टीम

राहुल त्रिपाठी, शुभमन गिल, नितीश राणा, सुनील नारायण, इयन मॉर्गन, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी, प्रसिद्ध कृष्णा, वरुण चक्रवर्ती

Published by: Shreyas
First published: October 10, 2020, 3:27 PM IST
Tags:

ताज्या बातम्या