मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2020 : कार्तिकचं कर्णधारपद जाणार, या दोन खेळाडूंनी आधीच केली होती भविष्यवाणी

IPL 2020 : कार्तिकचं कर्णधारपद जाणार, या दोन खेळाडूंनी आधीच केली होती भविष्यवाणी

आयपीएल (IPL 2020) स्पर्धेच्या अर्ध्यातच दिनेश कार्तिक (Dinesh Karthik)ने कोलकाता (KKR)च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. दिनेश कार्तिकच्याऐवजी आता इयन मॉर्गन (Eoin Morgan)आता कोलकात्याचा कर्णधार असेल.

अबु धाबी, 16 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) स्पर्धेच्या अर्ध्यातच दिनेश कार्तिक (Dinesh Karthik)ने कोलकाता (KKR)च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. दिनेश कार्तिकच्याऐवजी आता इयन मॉर्गन (Eoin Morgan)आता कोलकात्याचा कर्णधार असेल. कार्तिकने बॅटिंगवर लक्ष देण्यासाठी कर्णधारपद सोडल्याचं केकेआरकडून सांगण्यात आलं आहे. पण कोलकाता दिनेश कार्तिकऐवजी इयन मॉर्गनला कर्णधार करेल, अशा चर्चा सुरुवातीपासूनच सुरू होत्या.

भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर आणि मनोज तिवारी यांनी याबाबत भविष्यवाणी केली होती. कोलकात्याची सुरुवात चांगली झाली नाही, तर इयन मॉर्गन कर्णधार होऊ शकतो, असं गावसकर म्हणाले होते. तसंच मनोज तिवारीनेही इयन मॉर्गन कर्णधार होईल, असं 12 दिवसांपूर्वीच सांगितलं होतं.

मनोज तिवारी या मोसमात कोणत्याही टीममध्ये नाही, पण तो क्रिकबझवर क्रिकेट समिक्षकाची भूमिका बजावतो. याच कार्यक्रमात 4 ऑक्टोबरला मनोज तिवारीने मॉर्गनला टीमचं नेतृत्व दिलं जाऊ शकतं, अशी शक्यता वर्तवली होती. आताही त्याने याबाबत ट्विट केलं आहे. 'मोसम सुरू असतानाच कोलकात्यासारख्या मोठ्या टीमचं नेतृत्व सोडण्यासाठी हिंमत लागते. मला वाटतं कार्तिक बॅट्समन म्हणून चांगली कामगिरी करेल,' असं ट्विट मनोज तिवारीने केलं आहे.

दुसरीकडे इरफान पठाण याने या निर्णयावर शंका उपस्थित केली आहे. मोसमाच्या मध्येच कर्णधार बदलणं खेळाडूंसाठी कठीण असतं. कोलकाता इकडून भटकणार नाही, एवढीच अपेक्षा. केकेआर प्ले ऑफच्या शर्यतीत आहे, असं इरफान पठाण म्हणाला.

आकाश चोप्राने इयन मॉर्गनच्या फॉर्मवर भाष्य केलं आहे. 'कोलकात्याची आज मॅच आहे आणि त्यांनी हा निर्णय घेतला आहे. मॉर्गनकडून अपेक्षित असलेल्या फॉर्ममध्ये तो नाही. स्पर्धेतल्या आणखी एका परदेशी कर्णधाराचा फॉर्म खराब आहे,' अशी प्रतिक्रिया आकाश चोप्राने दिली.

First published:
top videos