मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : पुढच्या वर्षी खेळणार का नाही? शेवटच्या सामन्याआधी धोनी म्हणाला...

IPL 2020 : पुढच्या वर्षी खेळणार का नाही? शेवटच्या सामन्याआधी धोनी म्हणाला...

आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमाताला शेवटचा सामना खेळण्यासाठी चेन्नई (CSK)ची टीम मैदानात उतरली तेव्हा अनेकांच्या मनात धोनी (MS Dhoni) पुढच्या वर्षी खेळणार का नाही? हा प्रश्न पडला.

  • Published by:  Shreyas

अबु धाबी, 1 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमाताला शेवटचा सामना खेळण्यासाठी चेन्नई (CSK)ची टीम मैदानात उतरली तेव्हा अनेकांच्या मनात धोनी (MS Dhoni) पुढच्या वर्षी खेळणार का नाही? हा प्रश्न पडला. पंजाब (KXIP)विरुद्धच्या मॅचमध्ये धोनी जेव्हा टॉससाठी मैदानात आला तेव्हा त्यालाही हाच प्रश्न विचारण्यात आला. धोनीने या प्रश्नाला स्पष्ट उत्तर दिलं. माझा निवृत्त व्हायचा कोणताही विचार नाही, तसंच पिवळ्या जर्सीमधला हा माझा शेवटचा सामना नाही, मी आयपीएल खेळत राहणार आहे, असं धोनी म्हणाला. टॉसवेळी डॅनी मॉरिसन यांनी धोनीला हा प्रश्न विचारला.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात चेन्नईची कामगिरी खराब झाली. प्ले-ऑफच्या रेसमधून बाहेर पडणारी चेन्नई पहिलीच टीम ठरली. तसंच चेन्नई त्यांच्या आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच प्ले-ऑफमध्ये खेळताना दिसणार नाही. चेन्नईच्या खेळाडूंच्या वयामुळेही त्यांना संघर्ष करावा लागत असल्याची टीका तज्ज्ञांनी केली.

एमएस धोनीची ही शेवटची आयपीएल असेल अशा चर्चाही सुरू झाल्या. मुंबईविरुद्धच्या मॅचवेळी हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांनी धोनीकडून त्याची जर्सी घेतल्यामुळे, या चर्चांना आणखी उधाण आलं होतं.

धोनीसाठीही ही आयपीएल निराशाजनकची राहिली. त्याला या मोसमात 25 च्या सरासरीने 200 रन करता आले. धोनीचा स्ट्राईक रेटही 116.27 एवढाच होता. या मोसमात धोनीला फक्त 7 सिक्सच मारता आल्या. तसंच या आयपीएलमध्ये त्याला एकदाही मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला नाही. 2015 नंतर पहिल्यांदाच संपूर्ण आयपीएल मोसमात धोनीला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला नाही.

याच वर्षी 15 ऑगस्टला धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. 2019 वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनलनंतर धोनी मैदानात उतरला नव्हता. यानंतर 15 महिन्यांनी आपण आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार नसल्याचं धोनीने जाहीर केलं.

First published: