Home /News /sport /

IPL 2020 : दिल्लीच्या बॅट्समनची पहिल्यांदाच पडझड, राजस्थानला 185 रनचं आव्हान

IPL 2020 : दिल्लीच्या बॅट्समनची पहिल्यांदाच पडझड, राजस्थानला 185 रनचं आव्हान

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात दिल्ली (Delhi Capitals)च्या बॅट्समनची पहिल्यांदाच पडझड झाल्याचं पाहायला मिळालं. राजस्थान (Rajasthan Royals)विरुद्धच्या या मॅचमध्ये दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 185 पर्यंत मजल मारली.

    शारजाह : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात दिल्ली (Delhi Capitals)च्या बॅट्समनची पहिल्यांदाच पडझड झाल्याचं पाहायला मिळालं. राजस्थान (Rajasthan Royals)विरुद्धच्या या मॅचमध्ये दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 185 पर्यंत मजल मारली. राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. राजस्थानच्या बॉलरनी स्मिथचा हा निर्णय योग्य ठरवला आणि दिल्लीला सुरुवातीपासूनच धक्के दिले. शिमरन हेटमायरने 24 बॉलमध्ये 45 आणि मार्कस स्टॉयनीसने 30 बॉलमध्ये 39 रन केल्यामुळे दिल्लीला या स्कोअरपर्यंत पोहोचता आलं. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर कार्तिक त्यागी, ऍन्ड्रू टाय आणि राहुल तेवतिया यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. आजच्या मॅचसाठी राजस्थानने त्यांच्या टीममध्ये दोन बदल केले. अंकित राजपूत आणि टॉम करन यांच्याजागी एन्ड्रू टाय आणि वरुण एरॉनला संधी देण्यात आली आहे. तर दिल्लीने त्यांच्या टीममध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. पॉईंट्स टेबलमध्ये दिल्लीची टीम 5 मॅचमध्ये 4 विजयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर राजस्थानला 5 पैकी फक्त 2 मॅच जिंकता आल्या आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थानची टीम सातव्या क्रमांकावर आहे. राजस्थानने यंदाच्या मोसमात दोन्ही मॅच या शारजाहच्याच मैदानात जिंकल्या आहेत. आजची मॅचही तिकडेच होत असल्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची राजस्थानची इच्छा असेल. राजस्थानची टीम यशस्वी जयस्वाल, जॉस बटलर, स्टीव्हन स्मिथ, संजू सॅमसन, महिपाल लोमरोर, राहुल तेवतिया, जोफ्रा आर्चर, एन्ड्रू टाय, श्रेयस गोपाळ, कार्तिक त्यागी, वरुण एरॉन दिल्लीची टीम पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, मार्कस स्टॉयनीस, शिमरन हेटमायर, आर अश्विन, अक्सर पटेल, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, एनरिच नोर्टजे
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या