स्पोर्ट्स

  • associate partner

IPL 2020 : श्रेयस अय्यरच्या 'त्या' मताशी प्रशिक्षक पॉण्टिंग सहमत नाही

IPL 2020 : श्रेयस अय्यरच्या 'त्या' मताशी प्रशिक्षक पॉण्टिंग सहमत नाही

IPL 2020 दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)चे प्रशिक्षक रिकी पॉण्टिंग (Ricky Pointing) यांनी कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) च्या मताशी असहमती दर्शवली आहे.

  • Share this:

दुबई, 30 सप्टेंबर : IPL 2020 मधल्या दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)चे प्रशिक्षक रिकी पॉण्टिंग यांनी कर्णधार श्रेयस अय्यरच्या मताशी असहमती दर्शवली आहे. सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्धच्या मॅचमध्ये दिल्लीला पराभवाचा धक्का बसला. हैदराबादने आम्हाला सगळ्याच विभागात मात दिली, असं रिकी पॉण्टिंग म्हणाला. तसंच खेळपट्टीला दोष देता येणार नाही, कारण जेव्हा त्यांची टीम बॅटिंग करत होती, तेव्हा खेळपट्टी चांगली होती, अशी प्रतिक्रिया पॉण्टिंगने दिली. सनरायजर्स हैदराबादने दिलेल्या 163 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला 7 विकेट गमावून 147 रनच करता आल्या. दिल्लीच्या टीमचा यंदाच्या मोसमातला हा पहिलाच पराभव आहे.

पॉण्टिंगने मान्य केली दिल्लीची चूक

हैदराबादने योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी केल्याचं मत पॉण्टिंगने मांडलं. 'परिस्थिती वेगळी होती, असं मला वाटत नाही. मैदान मोठं होतं. स्क्वेअर बाऊंड्री लांब होती. पण शेवटी हैदराबादने आम्हाला हरवलं. आम्हाला सर्वोत्तम कामगिरी करता आली नाही. हैदराबादने चांगल्या पार्टनरशीप केल्या. तसंच स्ट्राईकही चांगल्या पद्धतीने रोटेट केला. काही खेळाडूंनी मोठा स्कोअर केला. याचाच फरक शेवटी पडला,' असं पॉण्टिंगने सांगितलं.

ओपनर जॉनी बेयरस्टोचं अर्धशतक आणि राशीद खानच्या जबरदस्त बॉलिंगमुळे हैदराबादने यंदाच्या आयपीएल (IPL 2020) मधला आपला पहिला सामना जिंकला. 'जर एखादा बॅट्समन टिकून खेळला असता आणि मोठा स्कोअर केला असता, 60-70 रनची खेळी केली असती, तर कदाचित आम्ही मॅच जिंकू शकलो असतो,' असं पॉण्टिंग म्हणाला.

दुसऱ्या इनिंगमध्ये बॉल असमान गतीने येत असल्याचं दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितलं, पण पॉण्टिंगच्या मते परिस्थिती दिल्लीच्या बॅटिंगवेळी चांगली होती. 'खेळपट्टी चांगली दिसत होती, तसंच गवतही होतं. नव्या बॉलने जास्त उसळी मिळत नव्हती. वॉर्नर आणि बेयरस्टोने सुरुवातीला परिस्थितीनुसार चांगली बॉलिंग केली. दोघांनी धावून रन काढल्या. खेळपट्टी दुसऱ्या इनिंगमध्ये थोडी चांगली होती. धुकं असल्यामुळे आम्हाला बॅटिंगला फायदा व्हायला पाहिजे होता, पण आम्ही कोणतंही कारण सांगणार नाही. त्यांनी आम्हाला हरवलं,' अशी कबुली पॉण्टिंगने दिली.

Published by: Shreyas
First published: September 30, 2020, 7:23 PM IST
Tags: IPL 2020

ताज्या बातम्या