Home /News /sport /

IPL 2020 : गर्लफ्रेंड अचानक समोर आल्यामुळे रडायला लागला खेळाडू, VIDEO VIRAL

IPL 2020 : गर्लफ्रेंड अचानक समोर आल्यामुळे रडायला लागला खेळाडू, VIDEO VIRAL

कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे यंदाच्या वर्षाची आयपीएल (IPL 2020) उशीरा सुरू झाली. एवढच नाही तर ही स्पर्धा यंदा युएईमध्ये खेळवण्यात येत आहे. आयपीएलच्या वेळी दरवर्षी खेळाडू त्यांच्या कुटुंबासोबत प्रवास करत असतात. यावेळी मात्र कोरोनामुळे खेळाडू त्यांच्या कुटुंबापासून लांब आहेत.

पुढे वाचा ...
    दुबई, 14 ऑक्टोबर : कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे यंदाच्या वर्षाची आयपीएल (IPL 2020) उशीरा सुरू झाली. एवढच नाही तर ही स्पर्धा यंदा युएईमध्ये खेळवण्यात येत आहे. आयपीएलच्या वेळी दरवर्षी खेळाडू त्यांच्या कुटुंबासोबत प्रवास करत असतात. यावेळी मात्र कोरोनामुळे खेळाडू त्यांच्या कुटुंबापासून लांब आहेत. त्यामुळे खेळाडूंना कुटुंबाची आठवण येणं स्वाभाविकच आहे. त्यामुळे दिल्ली (Delhi Capitals)च्या टीमने खेळाडूंना खास सरप्राईज दिलं. दिल्लीच्या खेळाडू आणि सहकाऱ्यांना एकत्र बसवून त्यांना प्रोजेक्टरवर त्यांच्या कुटुंबाचा व्हिडिओ दाखवण्यात आला. दिल्लीचा खेळाडू शिमरन हेटमायर (Shimron Hetmyer)ची गर्लफ्रेंड जेव्हा मोठ्या पडद्यावर दिसली, तेव्हा त्याला अश्रू अनावर झाले. दिल्लीने हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेयर केला आहे. दिल्लीच्या टीमचे सहमालक पार्थ जिंदल यांची ही कल्पना होती. ज्या मॅचमध्ये दिल्लीने चांगली कामगिरी केली नाही, त्या मॅचच्या क्लिप्स प्रोजेक्टरवर दाखवल्या जातील, असं खेळाडूंना सांगण्यात आलं. पण जेव्हा त्यांनी प्रोजेक्टर सुरु केला, तेव्हा बरेच खेळाडू भावनिक झाले. प्रोजेक्टरवर खेळाडूंच्या कुटुंबाचे व्हिडिओ मेसेज दाखवण्यात आले. हेटमायर प्रमाणेच मार्कस स्टॉयनिसही कुटुंबाला बघितल्यावर भावुक झाला. यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्लीची कामगिरी उत्कृष्ट झाली आहे. पॉईंट्स टेबलमध्ये दिल्लीची टीम दुसऱ्या क्रमांकावर आहे. एवढच नाही तर दिल्लीची टीम यंदाच्या वर्षी आयपीएल जिंकण्यासाठीची प्रबळ दावेदार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्लीच्या टीमने 7 पैकी 5 मॅच जिंकल्या आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या