अबु धाबी, 11 ऑक्टोबर : शिखर धवनचं अर्धशतक आणि श्रेयस अय्यरच्या संयमी खेळीमुळे दिल्लीने मुंबईला विजयासाठी 163 रनचं आव्हान दिलं आहे. या मॅचमध्ये टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या दिल्लीची सुरुवात खराब झाली. ओपनर पृथ्वी शॉ आणि यंदाच्या मोसमातली पहिलीच मॅच खेळणारा अजिंक्य रहाणे स्वस्तात माघारी परतले. यानंतर शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी दिल्लीचा डाव सावरला. शिखर धवनने 52 बॉलमध्ये नाबाद 69 रन केले. तर श्रेयस अय्यर 33 बॉलमध्ये 42 रन करुन आऊट झाला. दिल्लीला त्यांच्या 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 162 रनपर्यंत मजल मारता आली. मुंबईकडून कृणाल पांड्याने 3 विकेट घेतल्या, तर ट्रेन्ट बोल्टला एक विकेट मिळाली.
आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमातल्या दोन दिग्गज टीम आज आमन-सामने आहेत. रोहित शर्माच्या मुंबई (Mumbai Indians) चा सामना श्रेयस अय्यरच्या दिल्ली (Delhi Capitals) सोबत होत आहे. या मॅचमध्ये श्रेयस अय्यरने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. दिल्लीच्या टीमने या मॅचमध्ये दोन बदल केले आहेत. हेटमायरच्या बदली ऍलेक्स कॅरी आणि ऋषभ पंतच्या जागी अजिंक्य रहाणेला संधी देण्यात आली आहे. अजिंक्य रहाणेचा या मोसमातला हा पहिलाच सामना आहे. तर दुसरीकडे मुंबईने मात्र टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही.
पॉईंट्स टेबलमध्ये दिल्लीची टीम ही पहिल्या क्रमांकावर आहे. दिल्लीने आतापर्यंत 6 पैकी 5 मॅचमध्ये विजय मिळवला आहे, तर त्यांना एक मॅच गमवावी लागली आहे. दुसरीकडे मुंबईची टीम पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईने या मोसमात 6 पैकी 4 मॅच जिंकल्या असून 2 मॅचमध्ये त्यांच्या पदरी निराशा पडली.
मुंबईची टीम
रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, जेम्स पॅटिनसन, राहुल चहर, ट्रेन्ट बोल्ट, जसप्रीत बुमराह
दिल्लीची टीम
शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, ऍलेक्स कॅरे, मार्कस स्टॉयनिस, अक्सर पटेल, हर्षल पटेल, आर. अश्विन, कगिसो रबाडा, एनरिच नोर्टजे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.