Home /News /sport /

IPL 2020 : धवन-अय्यरचं अर्धशतक, दिल्लीचं राजस्थानला 162 रनचं आव्हान

IPL 2020 : धवन-अय्यरचं अर्धशतक, दिल्लीचं राजस्थानला 162 रनचं आव्हान

शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली (Delhi Capitals)ने राजस्थानला विजयासाठी 162 रनचं आव्हान ठेवलं आहे.

    दुबई, 14 ऑक्टोबर : शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली (Delhi Capitals)ने राजस्थानला विजयासाठी 162 रनचं आव्हान ठेवलं आहे. दिल्लीला त्यांच्या 20 ओव्हरमध्ये 161/7 पर्यंतच मजल मारता आली. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या दिल्लीची सुरुवात अत्यंत खराब झाली ओपनर पृथ्वी शॉ शून्य रनवर आऊट झाला. तर तिसऱ्या क्रमांकावर आलेला अजिंक्य रहाणेही 2 रन करून माघारी परतला. यानंतर शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यरने दिल्लीचा डाव सावरला. धवनने 33 बॉलमध्ये 57 आणि अय्यरने 43 बॉलमध्ये 53 रन केले. पण राजस्थानच्या बॉलरनी या दोघांच्या विकेट मोक्याच्या क्षणी घेतल्या, त्यामुळे दिल्लीला शेवटच्या ओव्हरमध्ये फटकेबाजी करता आली नाही. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरला 3, जयदेव उनाडकटला 2 तर कार्तिक त्यागी आणि श्रेयस गोपाळ यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. आयपीएल (IPL 2020)मध्ये आज दिल्ली (Delhi Capitals)चा सामना राजस्थान (Rajasthan Royals)सोबत होत आहे. या मॅचमध्ये दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)ने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. या मॅचमध्ये दिल्लीने एक बदल केला आहे. हर्षल पटेलच्या ऐवजी तुषार देशपांडेला संधी देण्यात आली आहे. तर राजस्थानच्या टीमने मात्र एकही बदल केलेला नाही. दिल्लीच्या टीममध्ये मात्र आज 4 मुंबईकर खेळत आहेत. पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर आणि तुषार देशपांडे हे चौघे मुंबईकर आज दिल्लीच्या टीममधून खेळत आहेत. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दिल्लीची टीम जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, तर राजस्थानच्या टीमला बरेच चढ-उतार पाहायला लागले आहेत. दिल्लीच्या टीमने या मोसमात 7 पैकी 5 मॅच जिंकल्या आहेत. तर राजस्थानला 7 पैकी 3 मॅच जिंकता आल्या आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थानची टीम सातव्या क्रमांकावर आणि दिल्लीची टीम दुसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थानच्या टीमने मागच्या मॅचमध्ये हैदराबादविरुद्ध रोमांचक विजय मिळवला होता. दिग्गज खेळाडू आऊट झाल्यानंतरही राहुल तेवातिया आणि रियान पराग या दोघांनी विजय खेचून आणला होता. तर दिल्लीच्या टीमचा मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये पराभव झाला होता. दिल्लीची टीम पृथ्वी शॉ, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मार्कस स्टॉयनिस, ऍलेक्स कॅरी, अक्सर पटेल, रवीचंद्रन अश्विन, तुषार देशपांडे, कागिसो रबाडा, एनरिच नोर्टजे राजस्थान रॉयल्स बेन स्टोक्स, जॉस बटलर, स्टीव्ह स्मिथ, संजू सॅमसन, रॉबिन उथप्पा, रियान पराग, राहुल तेवातिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाळ, जयदेव उनाडकट, कार्तिक त्यागी
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या