IPL 2020 : मुंबईच्या भेदक बॉलिंगपुढे दिल्लीची बॅटिंग गडगडली

IPL 2020 : मुंबईच्या भेदक बॉलिंगपुढे दिल्लीची बॅटिंग गडगडली

IPL 2020 मुंबई (Mumbai Indians)च्या भेदक बॉलिंगपुढे दिल्ली (Delhi Capitals)ची बॅटिंग गडगडली आहे. दिल्लीला 20 ओव्हरमध्ये फक्त 110 रनच करता आल्या.

  • Share this:

दुबई, 31 ऑक्टोबर : मुंबई (Mumbai Indians)च्या भेदक बॉलिंगपुढे दिल्ली (Delhi Capitals)ची बॅटिंग गडगडली आहे. दिल्लीला 20 ओव्हरमध्ये फक्त 110 रनच करता आल्या. टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतल्यानंतर ट्रेन्ट बोल्टने सुरुवातीलाच 2 विकेट घेत दिल्लीच्या बॅटिंगला खिंडार पाडलं. यानंतर दिल्लीची बॅटिंग सावरू शकली नाही. बोल्ट आणि बुमराहने प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या, तर नॅथन कुल्टर नाईल आणि राहुल चहर यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. दिल्लीकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक 25 रन केले.

मुंबईने या मॅचसाठी त्यांच्या टीममध्ये 2 बदल केले आहेत. हार्दिक पांड्या आणि जेम्स पॅटिनसन यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्याऐवजी जयंत यादव आणि नॅथन कुल्टर नाईल यांना संधी देण्यात आली आहे. तर दिल्लीनेही टीममध्ये 3 बदल केले आहेत. प्रवीण दुबे, पृथ्वी शॉ आणि हर्षल पटेल यांना स्थान देण्यात आलं आहे.

पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम पहिल्या तर दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईने याआधीच प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवलं आहे, तर आजचा सामना जिंकला तर दिल्लीही प्ले-ऑफमध्ये प्रवेश करेल.

मुंबईची टीम

क्विंटन डिकॉक, इशान किशन, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, जयंत यादव, राहुल चहर, नॅथन कुल्टर नाईल, जसप्रीत बुमराह, ट्रेन्ट बोल्ट

दिल्लीची टीम

पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शिमरन हेटमायर, मार्कस स्टॉयनिस, हर्षल पटेल, प्रविण दुबे, कगिसो रबाडा, आर अश्विन, एनरिक नॉर्किया

Published by: Shreyas
First published: October 31, 2020, 3:31 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading