सिडनी, 28 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारत (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia)चे खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना झाले. यामध्ये दिल्ली (Delhi Capitals) चा बॉलर संदीप लामीचाने (Sandeep Laminchhane) याला कोरोनाची लागण झाली आहे. दिल्लीची टीम यावर्षीच्या आयपीएल फायनलमध्ये पोहोचली होती, पण मुंबईने त्यांचा पराभव केला होता. 10 नोव्हेंबरला झालेल्या फायनलनंतर संदीप लामीचाने ऑस्ट्रेलियाला बिग बॅश लीगचा 10 वा सिझन खेळण्यासाठी गेला. पण बिग बॅश लीग सुरू होण्याच्या दोन आठवडे आधीच संदीप लामीचानेला कोरोना झाला. होबार्ट हरिकेन्सने संदीपसोबत करार केला.
20 वर्षांच्या संदीप लामीचाने याने ट्विटरवर आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं. 'मला कोरोना झाल्याचं तुम्हाला सांगणं हे माझं कर्तव्य आहे. बुधवारपासूनच माझ्या अंग दुखत होतं, आता माझ्या तब्येतीत थोडा सुधार झाला आहे. जर सगळं नीट झालं तर पुन्हा मैदानात पुनरागमन करेन. माझ्यासाठी प्रार्थना करा,' असं ट्विट लामीचाने याने केलं आहे.
संदीप लामीचाने याने बिग बॅश लीगमध्ये याआधीही उत्कृष्ट कामगिरी केली. मेलबर्न स्टार्सकडून खेळताना संदीप आणि एडम झम्पा यांच्या जोडीने धमाका केला होता. मेलबर्नसोबत यशस्वी मोसमानंतर संदीपने या मोसमासाठी हरिकेन्ससोबत करार केला.
संदीप लामीचाने नेपाळकडून क्रिकेट खेळतो. सोबतच तो पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि कॅनडामध्ये टी-20 लीगमध्येही सहभागी होतो. आयपीएलचा करार करणारा तो पहिला नेपाळी खेळाडू होता. 2018 सालापासून तो दिल्लीच्या टीममध्ये आहे, पण त्याला अजून एकही मॅच खेळण्याची संधी मिळाली नाही. मागच्याच आठवड्यात तो ऑस्ट्रेलियाला पोहोचला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.