मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : अजिंक्य रहाणेचं 'मिड सिझन ट्रान्सफर'? दिल्लीची टीम म्हणते...

IPL 2020 : अजिंक्य रहाणेचं 'मिड सिझन ट्रान्सफर'? दिल्लीची टीम म्हणते...

आयपीएल (IPL 2020)मध्ये दिल्ली (Delhi Capitals) च्या टीममध्ये असलेल्या मोठ्या नावांमुळे आणि त्यांच्या कामगिरीमुळे अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)ला संधी मिळालेली नाही.

  • Published by:  Shreyas

दुबई, 7 ऑक्टोबर : यंदाच्या आयपीएल (IPL 2020)मध्ये दिल्ली (Delhi Capitals)ची टीम जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. 5 पैकी 4 मॅच जिंकलेली दिल्लीची टीम पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. या सगळ्या मॅचमध्ये कठीण परिस्थितीमध्ये प्रत्येक वेळी वेगवेगळ्या खेळाडूने जबाबदारी घेत, टीमला विजय मिळवून दिला. टीममधल्या मोठमोठ्या नावांमुळे आणि त्यांच्या कामगिरीमुळे अजिंक्य रहाणे सारख्या दिग्गज खेळाडूला टीममध्ये स्थान मिळत नाही. भारताच्या टेस्ट टीमचा उपकर्णधार असलेला अजिंक्य रहाणे भारताच्या शेवटच्या टेस्ट सीरिजनंतर एकही मॅच खेळलेला नाही.

रहाणेला दिल्लीच्या टीममध्ये संधी मिळत नसल्यामुळे त्याला मिड सिझन ट्रान्सफरमध्ये दुसऱ्या टीमला दिलं जाईल, अशी चर्चा होती. दिल्लीच्या टीमने मात्र या सगळ्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिल्ली टीमचे अधिकारी म्हणाले, 'आमच्या दोन्ही ओपनरनी त्याला टीममध्ये पुनरागमन करण्याची संधी दिलेली नाही. सोशल मीडियावर जे बोललं जातं, तो टीम निवडीचा निकष नसतो. रहाणे हा उत्कृष्ठ खेळाडू आहे, तसंच तो सोबत अनुभवही घेऊन येतो. पण धवन आणि शॉ उत्तम कामगिरी करत आहेत. तुम्ही न तुटलेल्या गोष्टी जोडायचा प्रयत्न करत नाही. मागच्या दोन मोसमात आम्ही विश्वास दाखवलेल्या खेळाडूंसोबतच आम्ही खेळत आहोत. रहाणेला त्याच्या संधीची वाट बघावी लागेल.'

'रहाणे हा दिल्लीच्या टीमचा महत्त्वाचा भाग आहे. स्पर्धा सुरु असतानाच त्याला सोडून देण्यासाठी आम्ही टीममध्ये घेतलेलं नाही. बाहेर काहीही बोललं जाऊदे. तो टीमसोबत आहे आणि गरज असेल तेव्हा तो टीमला महत्त्वाच्या गोष्टीही सांगतो,' असं दिल्लीच्या टीमकडून सांगण्यात आलं.

'आयपीएल सारख्या स्पर्धेत मधल्या फळीत बॅटिंग करण्यासाठीची मागणी वेगळी आहे. अजिंक्यला मधल्या फळीत खेळायला सांगून तुम्ही त्याच्यावर अन्याय करू शकत नाही. हा निर्णय टीम प्रशासन घेते. तसंच काही गोष्टी फक्त करायच्या म्हणून केल्या जाऊ नयेत. यासाठी बरीच चर्चा होते आणि रणनीती ठरवली जाते,' असं दिल्ली टीमने अधिकृतरित्या सांगितलं.

First published: