Home /News /sport /

IPL 2020 : गब्बर पुन्हा चमकला, फायनल गाठण्यासाठी दिल्लीचं हैदराबादला मोठं आव्हान

IPL 2020 : गब्बर पुन्हा चमकला, फायनल गाठण्यासाठी दिल्लीचं हैदराबादला मोठं आव्हान

आयपीएल (IPL 2020)ची फायनल गाठण्यासाठी दिल्ली (Delhi Capitals)आणि हैदराबाद (SRH)यांच्यामध्ये लढत होत आहे.

    अबु धाबी, 8 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) गाठण्यासाठी दिल्ली (Delhi Capitals)ने हैदराबाद (SRH)ला मोठं आव्हान दिलं आहे. दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 189 रन केले आहेत, त्यामुळे हैदराबादला 190 रनचं आव्हान मिळालं आहे. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या दिल्लीची सुरुवात चांगली झाली. या मोसमात त्यांनी पहिल्यांदाच मार्कस स्टॉयनिसला ओपनिंगला पाठवलं होतं. स्टॉयनिस आणि शिखर धवनच्या जोडीने दिल्लीला 8.2 ओव्हरमध्येच 86 रन करून दिले. 27 बॉलमध्ये 38 रन करुन स्टॉयनिस माघारी परतला, तर शिखर धवन (Shikhar Dhawan) ने 50 बॉलमध्ये 78 रनची खेळी केली. शिमरन हेटमायरनेही 22 बॉलमध्ये नाबाद 44 रन केले. हैदराबादकडून संदीप शर्मा, जेसन होल्डर आणि राशिद खान यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. आयपीएल (IPL 2020)ची फायनल गाठण्यासाठी दिल्ली (Delhi Capitals)आणि हैदराबाद (SRH)यांच्यामध्ये लढत होत आहे. या मॅचमध्ये दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)ने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचमध्ये दिल्लीने टीममध्ये दोन बदल केले आहेत. सॅम्सच्याऐवजी हेटमायरला तर पृथ्वी शॉऐवजी प्रवीण दुबेला संधी देण्यात आली आहे. तर हैदराबादने त्यांच्या टीममध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. दिल्लीची टीम शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शिमरन हेटमायर, मार्कस स्टॉयनिस, अक्सर पटेल, आर. अश्विन, प्रवीण दुबे, कगिसो रबाडा, एनरिक नॉर्किया हैदराबादची टीम डेव्हिड वॉर्नर, श्रीवत्स गोस्वामी, मनिष पांडे, केन विलियमसन, प्रियम गर्ग, जेसन होल्डर, अब्दुल समद, राशिद खान, शाहबाज नदीम, संदीप शर्मा, टी नटराजन आजच्या मॅचमध्ये विजय मिळवलेली टीम मंगळवारी फायनलमध्ये मुंबई (Mumbai Indians)विरुद्ध खेळणार आहे. याआधी पहिल्या क्वालिफायर मॅचमध्ये मुंबईने दिल्लीचा अगदी सहज पराभव केला होता. पण पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या दोन क्रमांकावर राहिल्यामुळे मुंबईविरुद्धच्या पराभवानंतरही दिल्लीला पुन्हा एकदा फायनल गाठण्यासाठी संधी मिळाली आहे. तर दुसरीकडे हैदराबादने बँगलोरचा एलिमिनेटरमध्ये पराभव केला. पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहिल्यामुळे हैदराबादला फायनल गाठण्यासाठी आणखी एक मॅच जिंकावी लागणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या