Home /News /sport /

IPL 2020 : आयपीएल फायनलआधी दिल्लीचा प्रशिक्षक पॉण्टिंगचा मुंबईला इशारा

IPL 2020 : आयपीएल फायनलआधी दिल्लीचा प्रशिक्षक पॉण्टिंगचा मुंबईला इशारा

आयपीएल (IPL 2020)च्या फायनलमध्ये मुंबई (Mumbai Indians)चा सामना दिल्ली (Delhi Capitals) विरुद्ध होणार आहे. या मॅचआधी दिल्लीचा प्रशिक्षक रिकी पॉण्टिंग (Ricky Pointing) याने मुंबईच्या टीमला इशारा दिला आहे.

    दुबई, 10 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020)च्या फायनलमध्ये मुंबई (Mumbai Indians)चा सामना दिल्ली (Delhi Capitals) विरुद्ध होणार आहे. या मॅचआधी दिल्लीचा प्रशिक्षक रिकी पॉण्टिंग (Ricky Pointing) याने मुंबईच्या टीमला इशारा दिला आहे. फायनलसाठी आमच्या टीमला कमी लेखू नका, कारण आमच्या टीमची सर्वोत्कृष्ट कामगिरी अजूनही झालेली नाही, असं पॉण्टिंग म्हणाला आहे. दिल्लीने यावेळी पहिल्यांदाच आयपीएल फायनल गाठली आहे. तर मुंबईची ही सहावी आयपीएल फायनल आहे. याआधीच्या 5 फायनलपैकी 4 फायनलमध्ये त्यांचा विजय झाला, तर एकामध्ये त्यांचा पराभव झाला. या मोसमात दिल्लीविरुद्धच्या तिन्ही मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला होता. या मोसमातल्या आमच्या कामगिरीमुळे मी खुश आहे. हा हंगाम आमच्यासाठी चांगला राहिला. पण आम्ही इकडे आयपीएल जिंकण्यासाठी आलो आहोत, त्यामुळे आम्ही सर्वोत्तम कामगिरी करू, अशी प्रतिक्रिया पॉण्टिंगने दिली आहे. 'आम्ही चांगली सुरुवात केली, पण शेवटी थोडं अपयश आलं. आमच्या खेळाडूंनी तीनपैकी दोन मॅचमध्ये चांगली कामगिरी केली, आता फायनलमध्येही याचीच पुनरावृत्ती होईल, अशी अपेक्षा आहे. प्रत्येक टीमने काही मॅच जिंकल्या, तर काही गमावल्या. पण आम्हाला ग्रुप स्टेजमध्येच पराभव पचवावे लागले. खेळाडूंसाठीही लय बदलणं कठीण होतं, पण त्यांनी करून दाखवलं. आता आम्ही फायनलमध्ये आहोत. आमचं सर्वोत्तम क्रिकेट खेळणं अजून बाकी आहे,' असं वक्तव्य पॉण्टिंगने केलं. आयपीएलच्या फायनलआधी बोलताना मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, 'आम्हाला मनोवैज्ञानिक लाभ मिळू शकतो, कारण आम्ही याआधी बऱ्याच फायनल खेळल्या आहेत, तसंच यावर्षी तिन्ही मॅचमध्ये दिल्लीचा पराभव केला आहे. पण प्रत्येक दिवस नवा असोत, प्रत्येक दिवशी नवा दबाव असतो. प्रत्येक मॅच नवी असतो, त्यामुळे आधी काय झालं याबाबत जास्त विचार करुन चालणार नाही.'
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या